CBSE 12th Results 2020 Declared: सीबीएसई बारावी बोर्डाचा निकाल जाहीर, cbse.nic.in सहित 'इथे' तपासून पहा रिझल्ट

विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल cbseresults.nic.in, results.nic.in,cbse.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर वर पाहता येणार आहे

प्रातिनिधीक प्रतिमा | (Photo Credits: File Photo)

CBSE 12th Results 2020 Declared: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई तर्फे बारावी बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यंदा कोरोनाच्या (Coronavirus Pandemic)  संकटकाळात परीक्षा रद्द करून सीबीएसई तर्फे सरासरी आणि अंतर्गत मूल्यमापन गुणपद्धतीच्या आधारे निकाल जाहीर केला गेला आहे. यानुसार यंदा 88.78%.निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल cbseresults.nic.in, results.nic.in,cbse.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर वर पाहता येणार आहे. या संदर्भात माहिती देत केंद्रीय मंत्री रमेश पोखरीयल (Ramesh Pokhriyal Nishank) यांनी ट्विट केले आहे. तसेच उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन सुद्धा केलेले आहे.

विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्डाचा निकाल तपासताना सीबीएसईची प्रवेशपत्रे किंवा हॉल तिकिटे सुलभ ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण रोल नंबर इत्यादी तपशिलांसाठी विद्यार्थी आवश्यक असतील. खाली दिलेल्या वेबसाइटद्वारे तुम्ही निकाल तपासून पाहू शकता.

रमेश पोखरीयल ट्विट

CBSE 12th Results 2020 Websites

-cbse.nic.in

-results.nic.in

-cbseresults.nic.in

दरम्यान, अन्य ऑफलाईन माध्यमातून सुद्धा विद्यार्थी आपला निकाल जाणून घेऊ शकतात जसे की, विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून इमेल द्वारे निकाल पाठवण्यात येईल, तसेच DigiLocker App, DigiResults App, Umang App च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना थेट त्यांची गुणपत्रिका (रिझल्ट) सुद्धा प्राप्त करता येईल यासाठी झोनल ऑफिस मध्ये जाण्याची गरज लागणार नाही.