Edible Oil Price Hike: मोहरी, सोयाबीनसह इतर खाद्यतेलाच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवीन दर

कापूस लागवडीखालील क्षेत्र पूर्वीच्या 122.15 लाख हेक्टरवरून घटून 111.07 लाख हेक्टरवर आले आहे.

Edible Oil (फोटो सौजन्य - Pixabay)

Edible Oil Price Hike: देशातील बाजारपेठांमध्ये मोहरी आणि सोयाबीन तेलबियांची फारच कमी आवक झाल्यामुळे, खाद्यतेल-तेलबियांमध्ये मोहरी, सोयाबीन इत्यादींसह बहुतांश तेलबियांचे भाव (Oilseeds Prices) वाढले आहेत. आज मोहरीची आवक सुमारे एक लाख पोतीपर्यंत घटली आहे. तसेच सोयाबीनची आवकही सुमारे एक लाख पाच हजार पोत्यांपर्यंत घटली. यानंतर काही सणासुदीच्या मागणीमुळे इतर तेल आणि तेलबियांच्या किमतीही वाढल्या आहेत.

कापूस लागवडीखालील क्षेत्र घटले -

कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, खरीप कापूस लागवडीखालील क्षेत्र घटले आहे. कापूस लागवडीखालील क्षेत्र पूर्वीच्या 122.15 लाख हेक्टरवरून घटून 111.07 लाख हेक्टरवर आले आहे. यंदा बनावट कापूस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी सरकार महत्त्वपूर्ण पाऊले उचलत आहे. (हेही वाचा - Edible Oil Price Update: सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी! खाद्यतेलाच्या किमती वाढणार नाहीत; सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय)

बनावट कापूस बियाण्यामुळे शेतकरी हतबल -

बनावट कापूस बियाण्यांमुळे शेतकरी हतबल होत असून उत्पादनात घट होत आहे. फ्युचर्स ट्रेडिंगच्या व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे वायदे व्यवहारात जेवढा माल असेल तेवढा त्यांच्याकडे नसेल तर काही अर्थ नाही.

तेलबियांचे भाव -

मोहरी तेलबिया - 6,050-6,090 रुपये प्रति क्विंटल.

भुईमूग - 6,375-6,650 रुपये प्रति क्विंटल.

भुईमूग तेल मिल डिलिव्हरी (गुजरात) – रु 15,200 प्रति क्विंटल.

शेंगदाणा रिफाइंड तेल 2,270-2,570 रुपये प्रति टन.

मोहरीचे तेल दादरी - 11,800 रुपये प्रति क्विंटल.

मोहरी पक्की घणी - 1,900-2,000 रुपये प्रति टन.

तीळ तेल मिल डिलिव्हरी - 18,900-21,000 प्रति क्विंटल.

सोयाबीन मिल डिलिव्हरी इंदूर - रु. 9,900 प्रति क्विंटल.

सोयाबीन तेल देगम, कांडला - रु 8,500 प्रति क्विंटल.

कापूस बियाणे मिल डिलिव्हरी (हरियाणा) – 9,650 रुपये प्रति क्विंटल.

पामोलिन एक्स- कांडला - रु 9,225 (जीएसटी शिवाय) प्रति क्विंटल.

सोयाबीनचे धान्य - 4,360-4,390 रुपये प्रति क्विंटल.

खाद्यतेलबियांची किंमत वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे. खाद्यतेलाच्या किंमतीमुळे सणासुदीच्या काळात महिलांचं बजेट विस्कटणार आहे.