Ola Scooter Smash With Hammer: नव्या ओला स्कूटीच्या पहिल्या सेर्वीसचे 90 हजारांचे बील...पठ्ठ्याने संतापाच्या भरात शोरूमसमोरच दुचाकी फोडली (Video)

ग्राहक कंपनीबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी तो ओला शोरूमच्या बाहेर हातोड्याने स्कूटर फोडू लागला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Ola Scooter Smash With Hammer: मध्यमवर्गीय व्यक्ती आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशातील प्रत्येक पैसा वाचवून किंवा ईएमआयवर कार किंवा एखादे वाहन खरेदी करतो. अशा स्थितीत त्याच्या नवीन स्कूटरच्या पहिल्या सेवेचे मोठे बिल आले किंवा एखादा जास्तीचा भुर्दंड त्याला भरावा लागला. तर त्याच्या संतापाला अनावर राहत नाही. त्याला राग येणं स्वाभाविक आहे. अशाच एका घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती आपल्या ओला  स्कूटरच्या (Ola Scooter) सर्व्हिस चार्जमुळे संतप्त होऊन शोरूमसमोर दुचाकी हतोड्याने फोडतो आहे. ()

व्हायरल क्लिपमध्ये हा माणूस हातात हातोडा घेऊन स्कूटरवर हल्ला करताना दिसत आहे. क्लिपमध्ये, तो माणूस सांगतो की त्याने एक महिन्यापूर्वी ओला शोरूममधून इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली होती. ज्याचया पहिल्या सर्विसचे बिल 90 हजार रुपये झाले. सर्व्हिस चार्ज पाहून ग्राहकच नव्हे तर इंटरनेट वापरणाऱ्यांचेही हाल झाले होते.

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातोड्याने ओला स्कूटर तोडताना दिसत आहे. क्लिपमध्ये एकाने त्याला प्रश्न विचारला असता, बॅटरी खराब झाल्याच्या कारणाने कंपनीने त्याच्याकडे सर्व्हिसिंगसाठी ९० हजार बील पाठवले. असे तो म्हणतो. हे ऐकून काही लोक त्या व्यक्तीला स्कूटर पेटवण्याचा सल्लाही देत ​​आहेत.

90 हजारांचे बील पाहून स्कूटर फोडली…

गेल्या काही दिवसांत ओला स्कूटरची अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अलीकडेच कॉमेडियन कुणाल कामरा यांनी ओला स्कूटरच्या गुणवत्तेवर ओलाचे मालक भाविश अग्रवाल यांच्याशी X वर जोरदार वादविवाद केला होता. आत्तापर्यंत या व्हिडिओला सुमारे 4 लाख व्ह्यूज आणि 5 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओवर 400 हून अधिक प्रतिक्रिया आल्या आहेत. काही लोकही ग्राहकांच्या रागाचे समर्थन करत आहेत. त्याशिवाय काही लोक कंपनीकडून संपूर्ण पैसे परत करण्याची मागणी करत आहेत.