PM मोदींनी Dalai Lama यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने चीन संतापला, भारताने दिले 'असे' उत्तर

पंतप्रधानांनी स्वत: दलाई लामा यांच्याशी फोनवर बोलल्याचे सांगितले.

PM Narendra Modi (Pic Credit - ANI)

तिबेटी धर्मगुरू दलाई लामा (Tibetan spiritual leader Dalai Lama) गेल्या अनेक वर्षांपासून भारतात आहेत, तेथून ते जगभरात आपल्या धर्माचा आणि संस्कृतीचा प्रचार करत आहेत. मात्र चीनचा याला नेहमीच विरोध आहे. भारताने दलाई लामांना आश्रय दिल्यावर चीनने अनेकदा आक्षेप घेतला आहे. त्याचवेळी आता पीएम मोदींच्याा (PM Narendra Modi) एका ट्विटने वाद निर्माण झाला आहे. खरे तर 6 जुलैला दलाई लामा यांचा वाढदिवस होता, त्यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले तेव्हा चीन हादरला. दलाई लामांबाबत पंतप्रधान मोदींच्या भूमिकेबाबतही चीनने सल्ला दिला आहे.

चीनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तिबेट हा चीनचा अंतर्गत मामला आहे. यामध्ये बाहेरील कोणत्याही शक्तीने हस्तक्षेप करू नये. दलाई लामा यांचा चीनविरोधी फुटीरतावादी स्वभाव भारताने ओळखला पाहिजे.मात्र, चीनच्या या आक्षेपाला भारताकडूनही उत्तर देण्यात आले. ज्यामध्ये भारताने म्हटले आहे की, आमच्यासाठी दलाई लामा हे सन्माननीय पाहुणे आहेत, याकडे प्रत्येकाने या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. हेही वाचा Thane पाठोपाठ नवी मुंबईतही शिवसेनेला खिंडार; 32 माजी नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या भेटीला

परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, दलाई लामा हे धार्मिक नेते असून त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने आहेत. त्यांना धार्मिक आणि अध्यात्मिक कामांसाठी सूट देण्यात आली आहे. तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी दलाई लामा यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी स्वत: दलाई लामा यांच्याशी फोनवर बोलल्याचे सांगितले. मात्र दरवेळेप्रमाणेच यावेळीही चीनने पंतप्रधान मोदी आणि दलाई लामा यांच्यातील चर्चेवर आक्षेप घेतला आहे.