Hydrabad Accident Video: ब्रिजवर सेल्फी काढताना कारची धडक, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, हैद्राबाद येथील घटना
Car Accident Video TWITTER

Hydrabad Accident Video: हैद्राबादमध्ये शुक्रवारी दुर्गम चेरुवू ब्रिजवर एका वेगवान एसयुव्ही कारने एका तरुणाला धडक दिली आहे. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला आहे. ब्रिजवर सेल्फी घेत असताना ही घटना घडली आहे. ही घटना ब्रीजवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेअंतर्गत मृत तरुणाच्या मित्रांनी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.या घपघातानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- पुण्यात तीव्र उष्णतेने पेटली रॉयल एनफिल्ड बुलेट

मिळालेल्या माहितीनुसार, अनिक कुमार असं कार चालकाचे नाव आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, ब्रिजवर दोन मुले सेल्फी घेत असतात. अचानाक एक एसयुव्ही कार येते आणि एका तरुणाला धडक देते. धडकेत तरुण थेट पुढे जाऊन पडतो. पडल्यावर त्याला गंभीर दुखापत झाली.रक्तबंबाळ परिस्थिती पडलेला त्याला रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी तेथे मृत घोषित केले.

घटनास्थळी उपस्थित मित्रांनी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस व्हिडिओच्या माध्यामातून कार चालकाचा शोध घेत आहे. पोलिसांनी आरोपी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपासणी सुरु आहे. पोलिसांनी आयपीसीच्या कलम 304 (ए) आणि 337 अंतर्गत कायदेशीर कारवाई सुरू केली आहे आणि घटनेच्या आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहे.