Jammu-Kashmir Update: सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्याला केली अटक
बीएसएफने या पाकिस्तानी नागरिकाला शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री जम्मूच्या एरिना सेक्टरमधील आरएस पुरा भागात पकडले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी जम्मूच्या एरिना (Arena) सेक्टरमध्ये सीमेवर एका पाकिस्तानी घुसखोराला (Pakistani infiltrators) पकडले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी एका पाकिस्तानी घुसखोराला बीएसएफने पकडले आहे. गेल्या आठवडाभरातील घुसखोरीचा हा तिसरा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. बीएसएफने या पाकिस्तानी नागरिकाला शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री जम्मूच्या एरिना सेक्टरमधील आरएस पुरा भागात पकडले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. यापूर्वी 25 ऑगस्ट रोजी बीएसएफने जम्मूच्या सांबा भागात सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पाकिस्तानी घुसखोराला गोळ्या घालून ठार केले होते.
हे आरोपी अमली पदार्थांच्या तस्करीसाठी सीमा ओलांडून येत होते. बीएसएफच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी बीएसएफच्या जवानांना पाकिस्तानकडून संशयास्पद हालचाल दिसली. त्यानंतर सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या घुसखोराला जवानांनी गोळ्या घातल्या. बीएसएफच्या कारवाईनंतर जखमी घुसखोर घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. हेही वाचा Railway Recruitment Exam Cheating: रेल्वे परीक्षेमध्ये नकली परीक्षार्थी; बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन मधून सुटका मिळवण्यासाठी चक्क अंगठ्यावरील त्वचा दिली कापून पण 'असा' पकडला गेला!
घटनास्थळी बीएसएफ जवानांना रक्ताचे डाग आढळून आले. आरोपीने त्याच्या मागे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सोडले होते जे त्याने तस्करीसाठी आणले होते. या अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांच्याकडून सुमारे आठ किलो ड्रग्जची आठ पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय 21 ऑगस्ट रोजी राजौरी जिल्ह्यातील नौशेरा शहरातील सेहर माकरी भागात नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराच्या जवानांनी एका घुसखोराला गोळ्या घालून पकडले होते.
आरोपी हा आत्मघातकी हल्ल्यासाठी येत होता. तबरक हुसेन असे घुसखोराचे नाव आहे. राजौरी जिल्हा पोलिसांनी सांगितले होते की घुसखोराने लष्कराच्या जवानांपासून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु जखमी अवस्थेत तो पकडला गेला. त्यांनी सांगितले की, घुसखोराला प्राथमिक उपचारासाठी स्थानिक लष्करी आस्थापनात नेण्यात आले आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी लष्करी हॉस्पिटल राजौरी येथे हलविण्यात आले.