IPL Auction 2025 Live

Cyclone Biparjoy Update: 'बिपरजॉय' चक्रीवादळ आज गुजरातला धडकणार; तिन्ही सेना दल पूर्णपणे सज्ज, 76 गाड्या रद्द

दुपारी एक वाजल्यानंतर लँडफॉल सुरू होण्याची शक्यता आहे. या दरम्यान ताशी 120 ते 145 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.

Cyclone (Photo Credits: Pixabay)

Cyclone Biparjoy Update: 150 किमी वेगाने चक्रीवादळ बिपरजॉय (Cyclone Biparjoy) आज संध्याकाळी गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत आहे. भारतीय हवामान खात्यानुसार, आज 15 जून रोजी गुजरात आणि महाराष्ट्रात समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. त्यामुळे 16 जूनपर्यंत महाराष्ट्र आणि गुजरातसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून पश्चिम रेल्वेने 95 गाड्या रद्द केल्या आहेत. याशिवाय, रेल्वेने 32 गाड्या शॉर्ट टर्मिनेटेड आणि 26 गाड्या कमी केल्या आहेत. हवामानानुसार या गाड्या 16 जूनपासून नियमितपणे धावतील. सुरक्षेच्या दृष्टीने गुजरातमधील सुमारे 74 हजार लोकांना तात्पुरत्या शिबिरांमध्ये पाठवण्यात आले आहे. (हेही वाचा - Gujarat: तापीतील मिंधोळा नदीवरील पूल उद्घाटनापूर्वीच कोसळला; 15 गावे बाधित, होत आहेत भ्रष्टाचाराचे आरोप (Watch))

वादळामुळे कच्छसह गुजरातमधील आठ जिल्ह्यांमध्ये पूर आणि पावसासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 74 हजार लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स व्यतिरिक्त NDRF च्या 18 टीम तैनात आहेत. बिपरजॉय हे वादळ आज गुजरातमधील कच्छमध्ये धडकणार आहे. दुपारी एक वाजल्यानंतर लँडफॉल सुरू होण्याची शक्यता आहे. या दरम्यान ताशी 120 ते 145 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात.

दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही तयारीचा आढावा घेतला. तिन्ही दलांना बिपरजॉयसाठी पूर्णपणे तयार राहण्यास सांगितले आहे. गुजरातमध्ये येणाऱ्या चक्रीवादळासाठी लष्कराशिवाय सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) देखील सज्ज आहे. गुजरात किनारपट्टीकडे सरकणाऱ्या ‘बिपरजॉय’ या तीव्र चक्रीवादळाच्या परिणामांमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी बीएसएफने तयारी केली आहे. सुरक्षेची सर्व व्यवस्था करण्यात आली असून अशी उपकरणे जवानांना देण्यात आली आहेत, जी मदत आणि बचावकार्यात मदत करू शकतील.