Bihar Shocker: वादातून पतीने पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांची केली हत्या, पुढील तपास सुरु

भोजपूर पोलिस अधीक्षक कार्यालयाने मंगळवारी रात्री जारी केलेल्या निवेदनानुसार, पोलिसांनी या प्रकरणी तत्परतेने कारवाई करत पत्नीसह दोन अल्पवयीन मुलांची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक केली.

Murder | Representational image (Photo Credits: pixabay)

Bihar Shocker: बिहारमधील भोजपूर जिल्ह्यात एका व्यक्तीने वादानंतर पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. भोजपूर पोलिस अधीक्षक कार्यालयाने मंगळवारी रात्री जारी केलेल्या निवेदनानुसार, पोलिसांनी या प्रकरणी तत्परतेने कारवाई करत पत्नीसह दोन अल्पवयीन मुलांची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक केली. निवेदनानुसार, मंगळवारी पोलिसांना अजीमाबाद पोलिस स्टेशन हद्दीतील मिल्की गावातून माहिती मिळाली की, या गावातील रहिवासी लालू यादव नावाच्या व्यक्तीने पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर तिची आणि दोन अल्पवयीन मुलांची धारदार शस्त्राने हत्या केली. हे देखील वाचा: Bihar Shocker: बांका येथील तलावात बुडून चार अल्पवयीन मुलींचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबाला 4 लाख रुपय जाहीर

 माहिती मिळताच स्थानिक पोलीस, वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.

निवेदनात म्हटले आहे की, घटनेची सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येत असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात आरोपी हा मानसिक रित्या आजारी असल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif