Chhattisgarh Shocker! लग्न होत नसल्याने संतापलेल्या मुलाने केली आईची काठीने बेदम मारहाण करून हत्या

एका कलियुगी मुलाने आपल्याच आईला काठीने बेदम मारहाण केली. हे प्रकरण जिल्ह्यातील बागिचा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरायपाणी मुंडटोली येथील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाचे लग्न होत नव्हते, त्यामुळे तो संतापला होता.

Chhattisgarh Shocker! लग्न होत नसल्याने संतापलेल्या मुलाने केली आईची काठीने बेदम मारहाण करून हत्या
Murder | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Chhattisgarh Shocker! छत्तीसगडमधील (Chhattisgarh) जशपूरनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका कलियुगी मुलाने आपल्याच आईला काठीने बेदम मारहाण केली. हे प्रकरण जिल्ह्यातील बागिचा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरायपाणी मुंडटोली येथील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाचे लग्न होत नव्हते, त्यामुळे तो चांगलाच संतापला होता.

एका घरात वृद्ध महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. खोलीत वृद्ध महिलेचा मृतदेह पडलेला असल्याचे पोलिसांनी पाहिले. मृत महिलेच्या शरीरावर खोल जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. लालमुनीबाई असे मृत महिलेचे नाव आहे. 6 एप्रिल रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मृत लालमुनींचा आरडाओरडा झाल्याचा आवाज आल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. (हेही वाचा - Uttar Pradesh: अभ्यास करत नाही म्हणून मुलाचे हात बांधून छताला लटकवले, आरोपी वडिलांना अटक)

महिलेचा आवाज ऐकून शेजारी मध्यस्थी करण्यासाठी तिच्या घरी पोहोचले असता मुलाने सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली. मुलगा आपल्या आईला बेदम मारहाण करत असल्याचे शेजाऱ्यांनी पाहिले. मारहाणीदरम्यान आरोपी मुलगा वय जास्त होऊनही तिने आपलं लग्न केलं नसल्याचा आरोप लावत होता. शेजारील व्यक्तीने मुलाला थांबवले असता आरोपी मुलाने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे सर्व शेजारी घटनास्थळावरून निघून गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी शेजाऱ्यांना आरोपीच्या घराच्या अंगणात रक्ताचे डाग दिसले. शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता, घराच्या आतील खोलीत मृत महिलेचा मृतदेह पडलेला आढळून आला. आजूबाजूला रक्ताचे लोट पसरले होते. याप्रकरणी कारवाई करताना बगिचा पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Apr 09, 2023 03:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).