Akshay Kumar: अयोध्येत खिलाडी अक्षय कुमारची सेवा; 1,250 वानरांना हरभरा, गूळ आणि केळी घातली खाऊ (Watch Video)
Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमार त्याच्या चित्रपट आणि अभिनयासोबतच आपल्या सामाजिक कार्यातूनही चाहत्यांची मने जिंकतो. गेल्या महिन्यात त्याने अयोध्येतील वानरांसाठी (Monkeys) अंजनेय सेवा ट्रस्टला कोट्यवधी रुपयांची देणगी (Akshay Kumar Donate)दिली होती. यासंदर्भात आता त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याला 'एक छोटासा प्रयत्न' असे कॅप्शन दिले. सध्या हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. (हेही वाचा:Dacoit Poster: मृणाल ठाकूरने 'डकैत' मध्ये श्रुती हासनची घेतली जागा, पाहा चित्रपटाचे नवीन पोस्टर)
अक्षय कुमारने अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी करोडो रुपयांची देणगी दिली आहे. त्यानंतर ते वानरांसाठी देणगी दिली, जेणेकरून वानरांना अन्न आणि सेवा देता येईल.अक्षय कुमारने ही देणगी अंजनेय सेवा ट्रस्टला दिली होती. या उपक्रमांतर्गत ट्रस्टतर्फे माकडांना हरभरा, गूळ आणि केळी खाऊ घातली जात आहेत. त्याची एक सुंदर झलक अक्षय कुमारने व्हिडिओद्वारे शेअर केली आहे.
माकडांचे पोषण आणि स्वच्छतेची काळजी
अक्षय कुमारने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये वानरांना केळी, गूळ, हरभरा खाऊ घातला जात आहे. यासोबत व्हिडिओमध्ये लिहिले आहे की, 'पवित्र धार्मिक नगरी अयोध्येत वानरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांवर हल्ले होऊ नयेत किंवा त्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी त्यांना अन्न देण्याची गरजही वाढली आहे. काही बदल करण्याची वेळ आली आहे. अयोध्येतील माकडांना दररोज स्वच्छ आणि पौष्टिक अन्न मिळावे यासाठी आम्ही अंजनेय सेवा ट्रस्टसोबत हा उपक्रम सुरू केला.
वानरांसाठी केळी, गूळ आणि हरभराचे खाद्य
वानरांसह गाईची सेवा
व्हिडिओमध्ये पुढे म्हटले आहे की, 'स्वच्छता आणि सुरक्षिततेला प्राधान्य आहे. त्यानंतर केळीची साले गायीला खायला दिली जातात. केळीच्या लागवडीत शेणखताचा वापर केला जातो. व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येत गायींसोबतच दररोज 1250 हून अधिक वानरांना अन्न दिले जात आहे.