75th Independence Day 2021: स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने एकूण 1,380 भारतीय वीरांचा सरकारकडून होणार सन्मान, जाणून घ्या नक्की कोणाला मिळणार पुरस्कार ?

यावर्षी 1,380 शूरवीरांना शौर्य पुरस्कारांनी (Bravery awards to police) सन्मानित केले जाईल.

Parliament building (Photo Credits: Twitter)

देश स्वातंत्र्याचा 75 (Independence Day 2021) वा सण साजरा करणार आहे. या प्रसंगी देशाचे रक्षण करण्यासाठी आणि शत्रूंना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तयार असलेल्या योद्ध्यांचा (Warriors) स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सन्मान केला जाईल. यावर्षी 1,380 शूरवीरांना शौर्य पुरस्कारांनी (Bravery awards to police) सन्मानित केले जाईल. केंद्रीय पोलीस खात्याने (Central Police Department) शनिवारी शौर्यासाठी राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक, विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि या पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे इतर शौर्य पुरस्कार जाहीर केले. मंत्रालयाच्या (MHA) मते, शौर्यासाठी राष्ट्रपती पोलीस पदक 2 पोलीस (Police) कर्मचाऱ्यांना देण्यात येईल आणि शौर्यासाठी पोलीस पदक 628 जवानांना देण्यात येईल. याशिवाय 662 पोलीस कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस पदक देऊन सन्मानित केले जाईल. 88 पोलिसांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक दिले जाईल.

सीमेवर तैनात 23 ITBP जवानांना शौर्यासाठी पोलीस पदक देण्यात येईल. जे चीनच्या सीमेवर तैनात राहून देशाचे संरक्षण करतात. यापैकी 20 जवानांना मे-जून, 2020 मध्ये पूर्व लडाखमध्ये झालेल्या चकमकींमध्ये दाखवलेल्या शौर्याबद्दल पुरस्कार देण्यात आले आहेत.

त्याच वेळी जास्तीत जास्त पदके जम्मू आणि काश्मीर पोलिसांना गेली आहेत. यामध्ये जम्मू -काश्मीरमधील 256 पोलीस आणि सीआरपीएफच्या 151 शूर जवानांचा समावेश आहे. याशिवाय ओडिशामधील 67, महाराष्ट्रातील 25 आणि छत्तीसगड पोलिसांच्या 20 जणांचा समावेश आहे. यासह, इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील काही पोलिसां व्यतिरिक्त, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या जवानांनाही पुरस्कार देण्यात येईल.

भारत चीनच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) च्या 20 जवानांना लष्करासह पूर्व लडाखमध्ये चिनी आक्रमकतेला पराभूत करण्यात त्यांच्या शौर्याबद्दल पुरस्कार देण्यात आला आहे. आयटीबीपीने एका निवेदनात म्हटले आहे की, छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी कारवायांसाठी इतर तीन जणांना पीएमजी प्राप्त झाले आहे. ज्यातून पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांची एकूण संख्या 23 झाली आहे.

आयटीबीपीला सीमेवर तोंड देताना चकमकीत सीमा रक्षणाच्या कर्तव्यात शौर्य पदकांसाठी बहाल करण्यात आलेली ही सर्वोच्च संख्या आहे. 15 जून, 2020 रोजी गलवान खोऱ्यावरील कारवाईमध्ये सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचा तसेच 18 मे, 2020 रोजी फिंगर 4 क्षेत्र आणि हॉट स्प्रिंग्समधील हिंसक समोराशी संबंधित व्यक्तींचा समावेश आहे.