Leopard Attacks: उत्तराखंडात बिबट्याच्या हल्ल्यात 10 वर्षीय मुलाचा मृत्यू
या घटनेने संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
लहान मुलांवर प्राणी हल्ला (Animal attack) करण्याच्या अनेक घटना समोर येत असतात. यातून अनेक लहान जीवांचे प्राण गेले आहेत. नुकतीच एक अशीच घटना उत्तराखंड (Uttarakhand) मधील एका जिल्ह्यात घडली आहे. तिथे एका बिबट्याच्या (leopard) हल्ल्यात एका मुलाला आपला नाहक जीव गमवावा लागला आहे. या घटनेने संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पिथौरागड (PITHORAGARH) जिल्ह्यातील खेड्यात एका दहा वर्षाच्या मुलाची बिबट्याने हत्या केली आहे. अशी माहिती वन अधिकाऱ्याने बुधवारी दिली आहे. पिथौरागड विभागीय वन अधिकारी (DFO) विनय भार्गव यांनी सांगितले की, मुलगा मंगळवारी संध्याकाळी लातारी गावात दुकानातून आपल्या बहिणी समवेत घरी परतला होता त्यावेळी त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला, अशी माहिती पिथौरागड विभागीय वन अधिकारी (Divisional Forest Officer) विनय भार्गव (vinay bhargav) यांनी दिली.
मुलावर बिबट्या हल्ला करत होता. तेव्हा त्याची बहीण मदतीसाठी ओरडत होती. त्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. मुलाला काही मीटर खेचून मागे ठेवून सोडून दिले. बहिणीच्या ओरडण्याने गावकरी जमा झाले. गावकऱ्यांनी त्या मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे पोहचण्याआधीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शिकारीच्या शोधात अनेक जंगली प्राणी मानवी वस्तीमध्ये येतात. त्यामुळे अशा घटना घडतात. याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत.