Swiss Woman Murder Case: हातपाय बांधले, शरीर प्लास्टिकमध्ये गुंडाळले; स्विस महिलेच्या हत्येप्रकरणी दिल्लीतील व्यक्तीला अटक

गुरप्रीत सिंग असे आरोपीचे नाव आहे. आरोपीचे या महिलेसोबत संबंध होते. मात्र, तिचे आणखी कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून गुरप्रीतने तिची हत्या केली.

Swiss Woman Murder Case: दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) शनिवारी एका 30 वर्षीय स्विस महिलेच्या (Swiss Woman) हत्येप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली. तिचा मृतदेह पश्चिम दिल्लीतील टिळक नगर परिसरातून सापडला. महिलेचे हात आणि पाय धातूच्या साखळ्यांनी बांधलेले आढळले. तसेच वरील भाग प्लास्टिकच्या पिशवीने झाकलेला होता, असं पोलिसांनी सांगितले.

गुरप्रीत सिंग असे आरोपीचे नाव आहे. आरोपीचे या महिलेसोबत संबंध होते. मात्र, तिचे आणखी कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून गुरप्रीतने तिची हत्या केली.  गुरप्रीत तिला पाहण्यासाठी अनेकदा स्वित्झर्लंडला जात असे. मात्र, त्याला तिच्या अफेअरबद्दल संशय आल्याने त्याने महिलेला यावेळी भारतात येण्यास सांगितले आणि तिच्या हत्येचा कट रचला. (हेही वाचा - Viral Video: उत्तर प्रदेशातील महिला शिक्षकाचे रौद्ररुप, विद्यार्थीनीची केस ओढून मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कामावरून निलंबित)

प्राथमिक चौकशीत आरोपीने जादूटोण्याच्या बहाण्याने महिलेचे हातपाय बांधून नंतर तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी सकाळी टिळक नगर परिसरातील सरकारी शाळेजवळ महिलेचा मृतदेह आढळून आला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या मदतीने मृतदेह कारमध्ये आणल्याचे पोलिसांना समजले.

वाहनाच्या नोंदणी क्रमांकाची तपासणी केली असता एका टीमने वाहनाच्या मालकाचा शोध घेतला. मालकाने सांगितले की त्याने दोन महिन्यांपूर्वी कार विकली होती. अखेर गुरप्रीतचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. त्याच्या घरातूनही अधिकाऱ्यांनी 2.25 कोटी रुपये जप्त केले आहेत. पुढील तपास सुरू आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement