Hindu Population Declined : देशात हिंदू लोकसंख्येत 8 टक्क्यांची मोठी घट; मुस्लिम, ख्रिश्चन, शीखांच्या लोकसंख्येत वाढ, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या अहवालातून माहिती समोर

तर मुस्लिम लोकसंख्या 9.8 टक्क्यांवरून 14.09 टक्के झाली आहे. ख्रिश्चन लोकसंख्येचा वाटा 2.24 टक्क्यांवरून 2.36 टक्के झाला आहे. देशातील शीख समुदायाची लोकसंख्या 1.24 टक्क्यांवरून 1.85 टक्के झाली आहे.

Photo Credit -X

Hindu Population Declined : भारतातील बहुसंख्येत हिंदू लोकसंख्येचा वाटा 1950 ते 2015 दरम्यान 7.82 टक्क्यांनी घटला (Hindu Population Declined in India) आहे. तर, दुसरीकडे मुस्लिम, ख्रिश्चन, शीख आणि बौद्धांसह अल्पसंख्याक लोकसंख्येचा वाटा वाढला आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या (ईएसी-पीएम) सदस्या शमिका रवी यांनी एका वर्किंग पेपरमध्ये ही माहिती दिली आहे.

65 वर्षात लोकसंख्येतील बदल

अहवालानुसार, 1950 ते 2015 दरम्यान भारतातील बहुसंख्य हिंदू लोकसंख्येचा वाटा 7.82 टक्के कमी झाला आहे. तो पूर्वीच्या 84.68 टक्क्यांवरून 78.06 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. त्याच वेळी, मुस्लिम लोकसंख्येचा वाटा 1950 मध्ये 9.84 टक्क्यांवरून 2015 मध्ये 14.09टक्क्यांपर्यंत वाढला. त्याचप्रमाणे, ख्रिश्चन लोकसंख्येचा वाटा सहा दशकांमध्ये 2.24 टक्क्यांवरून 2.36 टक्के झाला आहे. तर शीख लोकसंख्येचा वाटा 1.24 टक्क्यांवरून 1.85 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. यासह, बौद्ध लोकसंख्येमध्ये 0.0 टक्क्यांवरून 0.81 टक्क्यांपर्यंत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. तथापि, भारतातील लोकसंख्येतील जैन समाजाचा वाटा 0.45 टक्क्यांवरून 0.36 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. त्याच वेळी, पारशी लोकसंख्या 0.03 टक्क्यांवरून 0.004 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे.

त्याशिवाय, देशात सध्याची परिस्थीती पाहता. सीएए कायद्यानुसार शेजारच्या भागातील अल्पसंख्याक लोक भारतात स्थलांतरित होत आहेत. सरकारने गेल्या सहा दशकांपासून शेजारील देशांत छळ झालेल्या अनेक नागरिकांना भारतात आश्रय दिला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif