Madhya Pradesh Gang Rape: पतीसोबत मंदिरात गेलेल्या नवविवाहितेवर 5 जणांचा सामूहिक बलात्कार; मध्य प्रदेशमधील घटना
नवीन लग्न झाल्यानंतर नवऱ्याबरोबर मंदिरात आणि तिथून पुढे फिरायला गेलेल्या एका महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Madhya Pradesh Gang Rape: नवीन लग्न झाल्यानंतर नवऱ्याबरोबर मंदिरात आणि तिथून पुढे फिरायला गेलेल्या एका महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मध्य प्रदेशच्या रेवा जिल्ह्यातून 21 ऑक्टोबर रोजी ही घटना समोर आली आहे. हे कृत्य करत असताना आरोपींनी सदर नवविवाहितेचा व्हिडीओही बनवला असला. जर हे प्रकरण कुठे बोलले गेले तर, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, 'नव दाम्पत्य 21 ऑक्टोबर रोजी दुचाकीवरून रेवा येथील मंदिरात आले होते. तिथून पुढे काही अंतरावर असलेल्या एका स्पॉटवर ते भटकंती करायला गेले. तिथेच आरोपी पार्टी करत होते. आरोपींनी आधी दाम्पत्याशी ओळख केली. त्यानंतर त्यांनी नवऱ्याला मारहाण करत पत्नीपासून दूर केले. त्यानंतर सामूहिक बलात्कार केला'. (Gulmarg Terror Attack: पीपल्स अँटी-फॅसिस्ट फ्रंटने जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली; मृतांची संख्या 5)
हे कृत्य करत असताना आरोपींनी सदर नवविवाहितेचा व्हिडीओही बनवला. जर या प्रकाराची कुठे वाच्यता केली तर सदर व्हिडीओ व्हायरल करू, अशी धमकी देण्यात आली. या धमकीमुळे पीडित दाम्पत्य पुढे यायला घाबरत होते. मात्र दुसर्या दिवशी म्हणजे 22 ऑक्टोबर रोजी त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन एफआयआर दाखल केला. पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार घटनास्थळी चार ते पाच आरोपी होते. मात्र पोलिसांना तपासात त्याहून अधिक लोक या गुन्ह्यात सहभागी असल्याचा संशय आहे. काही लोकांनी या आरोपींना मदत केली होती, अशी शक्यता पोलीसांनी व्यक्त केली.
नवविवाहित दाम्पत्याने रेवा येथील मंदिरात दर्शन घेतल्यानंतर एका सहलीच्या ठिकाणाला भेट दिली होती. दरम्यान आरोपी या घटनेच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत होते. घटनास्थळावरून मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. पीडितेने पोलिसांना सांगितले की, पाच आरोपींच्या हातावर आणि छातीवर टॅटू होते. या माहितीचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.