HIV in Tripura: त्रिपुरामध्ये 47 विद्यार्थ्यांचा एचआयव्ही संसर्गामुळे मृत्यू, 828 जणांची चाचणी पॉझिटिव्ह
त्रिपुरा राज्य एड्स कंट्रोल सोसायटी (TSACS) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्रिपुरामध्ये तब्बल 47 विद्यार्थ्यांचा एचआयव्हीमुळे मृत्यू झाला आणि 828 जणांची एचआयव्ही पॉझिटिव्ह चाचणी झाली आहे.
HIV in Tripura: त्रिपुरामध्ये तब्बल 47 विद्यार्थ्यांचा एचआयव्हीमुळे मृत्यू( HIV Death) झाला असून 828 जणांची एचआयव्ही चाचणी पॉझिटिव्ह (HIV Positive)झाल्याचे त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी (टीएसएसीएस) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 'आतापर्यंत एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेल्या 828 विद्यार्थ्यांची नोंदणी केली गेली आहे. त्यापैकी 572 विद्यार्थी अजूनही जिवंत आहेत. 47 जणांना या संसर्गामुळे जीव गमावावा लागला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी त्रिपुरा बाहेरील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी स्थलांतर केले आहे', असे TSACS च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा:Cigarette Smoking: आठवड्याला 400 सिगारेट ओढणे ब्रिटनमध्ये किशोरवयीन मुलीच्या जीवावर बेतले; फुफ्फुस बंद पडले, साडेपाच तासांची शस्त्रक्रिया करावी लागली )
TSACS च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिपुरा एड्स कंट्रोल सोसायटीने तब्बल 220 शाळा आणि 24 महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्याथ्यांची चाचणी केली. जे इंजेक्टेबल ड्रग्स घेतात. इतकेच नाही तर अलीकडील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की जवळपास दररोज एचआयव्हीची पाच ते सात नवीन प्रकरणे आढळून येत आहेत. त्रिपुरा जर्नालिस्ट युनियन, वेब मीडिया फोरम आणि TSACS यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या मीडिया कार्यशाळेला संबोधित करताना, TSACS च्या संयुक्त संचालकांनी त्रिपुरातील HIV च्या एकूण परिस्थितीचे सांख्यिकीय सादरीकरण केले.
ते म्हणाले,'आतापर्यंत, 220 शाळा आणि 24 महाविद्यालये आणि विद्यापीठे नजरेत आली आहेत. जिथे विद्यार्थी व्यसनाधीन अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे आढळले आहे. आम्ही राज्यभरातील एकूण 164 आरोग्य सुविधांमधून डेटा संकलित केला आहे.' मे 2024 पर्यंत, एआरटी (अँटीरेट्रोव्हायरल थेरपी) केंद्रांमध्ये 8,729 एचआयव्ही ग्रस्त लोकांची नोंदणी करण्यात आली. एचआयव्ही असलेल्या जिवंत लोकांची एकूण संख्या 5,674 आहे. त्यापैकी 4,570 पुरुष आहेत, तर 1,103 महिला आहेत.'
बहुतेक प्रकरणांमध्ये, मुले श्रीमंत कुटुंबातील आहेत. जे एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आले आहे. अशी कुटुंबे आहेत जिथे आई-वडील दोघेही सरकारी सेवेत आहेत. मुलांच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करणे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, हे त्यास कारणीभूत आहे. त्यामुळे त्यांची मुले ड्रग्जला बळी पडली.