Delhi Water Cut: आता दिल्लीकरणांना मोजावी लागणार प्रत्येक थेंबाची किंमत! दिल्लीत पाण्याच्या अपव्यय केल्यास द्यावा लागणार 2000 दंड
गुरुवारपासून दिल्ली जल बोर्डाच्या 200 टीम या कामात गुंतल्या जाणार आहेत. कडक उन्हाचा सामना करणाऱ्या दिल्लीत पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत दिल्लीतील जे लोक पाण्याचा गैरवापर करताना आढळतील त्यांना 2 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे
Delhi Water Cut: दिल्लीत राहणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. आता दिल्लीत (Delhi) पाण्याचा अपव्यय करणाऱ्याला दोन हजार रुपयांचे चलन बजावण्यात येणार आहे. जर कोणी पाईपने कार धुताना पकडले गेले किंवा कोणाच्या घरातील टाकी ओव्हरफ्लो झाली तर त्याला 2000 रुपये दंड ठोठावला जाणार आहे.
चलन जारी करण्यासाठी 200 पथके तैनात -
गुरुवारपासून दिल्ली जल बोर्डाच्या 200 टीम या कामात गुंतल्या जाणार आहेत. कडक उन्हाचा सामना करणाऱ्या दिल्लीत पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत दिल्लीतील जे लोक पाण्याचा गैरवापर करताना आढळतील त्यांना 2 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. (हेही वाचा -Uttar Pradesh: ब्रिजभूषण सिंह यांचा मुलगा करणच्या ताफ्याने 3 मुलांना चिरडले; 2 जणांचा जागीच मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर)
याआधी दिल्लीबाबत आणखी एक बातमी समोर आली होती की, दिल्लीतील कामगार दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत काम करणार नाहीत. या कालावधीत त्यांचे पैसे कापले जाणार नाहीत. कडक उन्हामुळे दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी हा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा - Delhi Liquor Policy Case: अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, 7 दिवसांसाठी जामीन वाढवण्याची याचिका फेटाळली)
सक्सेना यांनी बुधवारी राष्ट्रीय राजधानीतील अनेक भागांमध्ये तापमान 50 अंश सेल्सिअसच्या जवळ असल्याने बांधकाम क्षेत्रातील कामगारांना दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत सुटी देण्याच्या सूचना दिल्या. लेफ्टनंट गव्हर्नर म्हणाले की दिल्ली विकास प्राधिकरणाने (डीडीए) कामगारांसाठी 20 मे पासून तीन तासांची सुट्टी लागू केली आहे. तसेच तापमान 40 अंश सेल्सिअसच्या खाली येईपर्यंत ही व्यवस्था सर्व ठिकाणी सुरू राहील, असं म्हटलं आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)