Delhi Shocker: दिल्ली हारदली, 350 रुपयांसाठी 18 वर्षाच्या तरुणाची चाकूनं भोसकून हत्या, आरोपीचा मृतदेहाजवळ डान्स
Delhi Crime Murder News

Delhi Shocker: दिल्लीत एक भयानक हत्याकांड घडला आहे ज्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. एका 18 वर्षाच्या तरुणीचा 16 वर्षाच्या मुलाने चाकूने भोसकून हत्या केली आहे. आरोपी मुलाने एकदा किंवा दोनदा नव्हे तर तब्बल 60 वेळा मुलीवर चाकून वार केला. एवढेच नाही तर आरोपी मुलाने  मृतदेहाजवळ डान्स केला आहे. पीडीत मुलीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असताना डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. हे भयावह कृत्य जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणी ही आरोपी मुलाच्या शेजारीच राहायची. दिल्लीतील वेलकम परिसरात ही घटना घडली. आरोपी मुलाने तरुणीकडे बिर्याणी खाण्यासाठी तरुणीकडे 350 रुपये मागितले. तरुणीने नकार दिल्याने आरोपीने असं कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपीवर आधीच एका खुनाचा गुन्हा प्रलंबित आहे.

अशा प्रकारे केला खून

तरुणीने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने पाठलाग करत तिच्यावर हल्ला केला. तिच्याकडून पैसे हिसकावून घेतले. पैस हिसकावून घेतल्यानंतर आरोपीनं तरुणाचा गळा आवळण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने खिशातून चाकू काढला आणि तिच्या मानेवर आणि छातीवर वार केला. तब्बल 60 वेळा वार केल्याचे सीसीटीव्ही दिसले आहे. या हल्लेत तरुणी रक्ताच्या थारोळात पडली होती. आरोपी मृतदेहाला खेचून बाजूला ओढतो. खून केल्यानंतर आरोपी नाचतो.

ही घटना परिसरात समजताच स्थानिकांनी तिला जीबीटी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल. या घटनेनंतर परिसरात मोठी शांतता पसरली. घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.