Oscars 2022: ऑस्कर अवॉर्ड्स सोहळा कधी आणि कुठे पाहायचा? भारताची 'ही' डॉक्युमेंटरीदेखील सामील आहे शर्यतीत
ऑस्कर 2022 या वर्षी रविवारी, 27 मार्च रोजी लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे.
Oscars 2022: चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित अकादमी पुरस्कार (Academy Awards) किंवा ऑस्कर (Oscar) ची तारीख अखेर समोर आली आहे. केवळ चित्रपट दिग्दर्शक किंवा अभिनेतेच या पुरस्काराची वाट पाहत नाहीत, तर मनोरंजन आणि कलेची आवड असणारे सर्वच जण या पुरस्काराची वाट पाहत आहेत. ऑस्कर 2022 मध्ये भारतासाठी यावेळी काय खास आहे आणि हा ऑस्कर सोहळा केव्हा आणि कुठे प्रसारित केला जाईल यासंदर्भात जाणून घेऊयात.
ऑस्कर 2022 या वर्षी रविवारी, 27 मार्च रोजी लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे. हे एबीसी चॅनेलवर रात्री 8 वाजता ईटी आणि 5 वाजता पीटीवर थेट प्रक्षेपित केले जाईल. हा सोहळा चॅनलच्या वेबसाइटवरही पाहता येईल. हा सोहळा HULU Live TV किंवा YouTube TV च्या सदस्यांनाही या कार्यक्रम पाहता येईल. याशिवाय TVNow आणि FuboTV देखील या ऑस्कर सोहळ्याचे प्रसारण करणार आहेत. (हेही वाचा - कोरोनानंतर 'या' चित्रपटांनी परत आणले सिनेमागृहांचे वैभव, घ्या जाणुन)
या दिवशी होणार भारतात ऑस्कर ब्रॉडकास्टिंग -
भारतात ऑस्करचे प्रक्षेपण 28 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजता होणार आहे. हा सोहळा दरवर्षी Star Movies, Star Movies HD, Star World वर प्रसारित केला जातो. यावर्षी Regna Hall, Amy Schumer, Wanda Skyes ऑस्कर अवॉर्ड शो होस्ट करत आहे. तर लेडी गागा, Shawn Mendes, Rami Malek, Mila Kunis, Halle Bailey, Naomi Scott, Jamie Lee Curtis आणि इतर सेलिब्रिटी हे पुरस्कार प्रदान करतील.
ऑस्करच्या शर्यतीत आहेत 'हे' चित्रपट -
Belfast
Don't Look Up
Drive my Car
Dune
CODA
King Richard
Licorice Pizza
The Power of the Dog
Nightmare Alley
West Side Story
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या यादीतील नामांकन -
Will Smith (King Richard)
Javier Bardem (Being the Ricardos)
Benedict Cumberbatch (The Power of The Dog)
Andrew Garfield (Tick tick...boom!)
Denzel Washington (The Tragedy of Macbeth)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या शर्यतीत
Jessic Chastain (The Eyes of Tammy Faye)
Penelope Cruz (Parallel Mothers)
Olivia Colman (The Lost Daughter)
Nicole Kidman (Being the Ricardos)
Kristen Stewart (Spencer)
भारताची 'हा' माहितीपट ऑस्कर पुरस्कार जिंकू शकतो -
'रायटिंग विथ फायर' या भारतीय माहितीपटाच्या नावाचाही यंदाच्या ऑस्कर नामांकनात समावेश आहे. या माहितीपटाला वैशिष्ट्य श्रेणीत नामांकन मिळाले आहे. सुष्मित घोष आणि रितू थॉमस या दोन नवोदित दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेली ही पहिली कथा आहे, ज्याचे खूप कौतुक झाले आहे. आता भारताचा हा माहितीपट ऑस्कर जिंकू शकतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.