'Vicky Vidya Ka Woh Wala Video' box office collection day 3 Box Office collection: राजकुमार रावच्या 'विकी विद्या..'ने आलियाच्या 'जिगरा'ला मागे टाकले, तीन दिवसात कमवले 'एवढे' कोटी

कारण काही दिवसांपूर्वी रिलीझ झालेल्या स्त्री 2 ची क्रेझ संपत नाही तोच त्याचा दुसरा चित्रपटही चित्रपटगृहांमध्ये चांगली कमाई करतोय.

Photo Credit-X

'Vicky Vidya Ka Woh Wala Video' box office collection day 3 Box Office collection: राजकुमार रावच्या(Rajkummar Rao) सक्सेस करियरची गाडी सध्या वेगात सुरू आहे. कारण काही दिवसांपूर्वी रिलीझ झालेल्या स्त्री 2 ची क्रेझ संपत नाही तोच त्याचा दुसरा चित्रपटही चित्रपटगृहांमध्ये चांगली कमाई करतोय. राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी (Tripti Dimri )यांची प्रमुख भूमिका असणारा विकी विद्या का वो वाला व्हिडिओ(Vicky Vidya Ka Woh Wala Video) हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस चांगलाच उतरल्याचं चित्र आहे. 11 ऑक्टोबर रोजी चित्रपट रिलिज झाल्यानंतर या चित्रपटानं भारतात तब्बल १९ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटानं आलिया भट्टच्या जिगरा चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर दिल्याचं दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर आलियाचा जिगरा अक्षरश: आपटल्याचं दिसत आहे.

राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी, मल्लिका शेरावत यांच्या दमदार भूमिका असणारा विकी विद्या का वो वाला व्हिडिओ या चित्रपटानं पहिल्या दिवश्शी 5.5 कोटी आणि दुसऱ्या दिवशी 6.9 कोटी तर तिसऱ्या दिवशी 6.25 कोटींची कमाई केली. रविवारी या चित्रपटाची एकूण कमाई ही 21.08 टक्के होती. (Do Patti Trailer Out: काजोल, क्रिती सेनन आणि शाहीर शेख स्टारर दो पत्ती चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, पहा व्हिडिओ)

तीन दिवसात कमवले 'एवढे' कोटी

ऋषिकेशमध्ये हरवलेली "सुहागरात सीडी" परत मिळवण्यासाठी विकी आणि विद्या बाहेर पडतात. मल्लिका शेरावतचे पात्र, चंदा राणी आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या मदतीने, हे जोडपे पोलिस आणि कुटुंबातील ज्येष्ठांना आवाहन करण्यापासून ते रात्री स्मशानभूमीत जाण्यापर्यंत कोणतीही कसर सोडत नाही. असे कथानक असलेला हा चित्रपट आहे.