‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; डॉ.अमोल कोल्हे यांनी शेअर केला भावुक व्हिडीओ

अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी सुद्धा स्वतःच्या ट्विटर अकाउंट वरून एक खास व्हिडीओ शेअर करत अशी हिंट दिली होती

Swarajyarakshak Sambhaji (Photo credit : Zee5)

‘झी मराठी’ वरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ (Swarajyarakhsak Sambhaji) ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सध्या माध्यमांमध्ये रंगत आहे, मालिकेत छत्रपती संभाजी यांची भूमिका साकारणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी सुद्धा स्वतःच्या ट्विटर अकाउंट वरून एक खास व्हिडीओ शेअर करत अशी हिंट दिली होती. आणि आता फेब्रुवारी महिन्यातच या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रदर्शित होणार असल्याचे देखील म्हंटले जातेय, तरीही अद्याप या जागी दुसरी कोणती मालिका सुरु होणार याविषयी काहीही माहिती देण्यात आलेली नाही.

अमोल कोल्हे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, सुरु झालेला प्रत्येक प्रवास कधी ना कधी संपणार हे निश्चित असते, तसाच हा एक प्रवास आयुष्यभराची शिदोरी देऊन गेलेला, स्वप्नपूर्तीचा अनुभव ठरलेला आहे, अर्थच कधीही न विसरता येणार असा हा प्रवास आहे असे म्हंटले आहे. 25 सप्टेंबर 2017 पासून स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेने टीआरपीच्या यादीत टॉप 5 मध्ये आपली जागा मिळवली होती. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मालिकेने 500 एपिसोड पूर्ण केले होते.

डॉ. अमोल कोल्हे ट्विट

दरम्यान, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यावर तसेच निवडून आल्यावर ही मालिका बंद होणार असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या खासदार पदाची जबाबदारी आणि मालिकेचे शूटिंग असे सर्व सांभाळत डॉ. अमोल कोल्हे यांनी जवळपास एक वर्ष या दोन्ही गोष्टी सांभाळल्या होत्या.