रात्रीस खेळ चाले 2: घुंगरांच्या तालावर शेवंताच्या मोहक अदा; अण्णांची प्रतिक्रिया पाहून तुम्हीही चक्रवाल (Watch Video)

तसेच शेवंताच्या चाहत्यांना या भागात तिचा मोहक अंदाज पुन्हा एकदा दिसून येणार आहे.

Ratris Khel Chale 2 (Photo Credits: Twitter)

झी मराठी (zee Marathi) वरील रात्रीस खेळ चाले (Ratris Khel Chale) मालिका दुसऱ्या पर्वात वेगवेगळ्या ट्विस्ट्स अँड टर्न्स मुळे अगदी सुरवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यातील अण्णा आणि शेवंताची पात्र साकरणारे माधव अभ्यंकर (Madhav Abhyankar) आणि अपूर्वा नेमाळकर (Apurva या जोडीची केमिस्ट्री तर सध्याचा बहुचर्चित विषय ठरली आहे. एकीकडे आपल्या मनमोहक अदांनी शेवंताने तरुण वर्गाला सुद्धा मालिकांकडे खेचून आणले तर दुसरीकडे डॅशिंग अण्णांना पाहण्यासाठी सुद्धा प्रेक्षक बरेच उत्सुक असतात. येत्या भागात सुद्धा प्रेक्षकांना या जोडीच्या केमिस्ट्रीचा आणखीन एक नमूना पाहायला मिळणार आहे. या भागात शेवंता पायात घुंगरू बांधून घरात डान्स करताना तितक्यात तिथे अण्णा येतात. शेवंताचे सौंदर्य पाहून नेहमीप्रमाणे अण्णा तिच्यावर भाळतात आणि तसेच एकटक बघत राहतात. पण आश्चर्य म्हणजे यावेळेस तिला भेटण्याऐवजी ते थेट आपल्या मित्रांना भेटायला नेहमीच्या दारूच्या अड्ड्यावर निघून जातात.

खरंतर अण्णा आणि शेवंता हे अनेकदा बिनधास्तपणे पाटणकरांच्या घरी भेटतात पण यावेळेस शेवंताची मुलगी सुसल्या घरात असल्याने त्यांची भेट होत नाही,म्ह्णून शेवंताचा डान्स पाहिल्यावर अण्णा मित्रांना भेटायला जातात. तिथे गेल्यावर अण्णांचा डावा हात म्हणून ओळखला जाणाऱ्या चोमट्या ते आपल्या तालावर नाचायला लावतात. यावेळेस चोमट्याची उडालेली धांधळ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. 'रात्रीस खेळ चाले 2’ मधील वच्छीचा 'नागिन डान्स' व्हायरल, तुम्ही पाहिलात का? (Watch Video)

पाहा या भागाची छोटीशी झलक

दरम्यान, याआधी झी मराठीवरील अवार्ड शो मध्ये शेवंताचा डान्स लोकांना आवडला होता. त्यानंतर आता मालिकेच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात येणाऱ्या शेवंताचा हा मोहक अंदाज पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तूर्तास रात्रीस खेळ चाले मालिका रंजक वळणावर आहे. मागील काही भागांमध्ये आपण पहिलेच असेल की, अण्णांनी जबरदस्ती छायाचे लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला असताना तिच्या नवऱ्याचा एकाएकी मृत्यू झाला. दुसरीकडे तिच्या प्रियकराचा ही खून झाला असल्याने ती अण्णांच्या विरोधात आता काय पाऊल उचलणार हे पाहण्यासाठी तुम्हाला मालिकेचा पुढचे भाग चुकवून चालणार नाहीत.