Karbhari Lay Bhari Song (Photo Credits: Instagram)

मागील काही दिवसांत टीव्हीवर अनेक नवनवीन मालिका पाहायला मिळत आहेत. यात सध्या प्रोमोज आणि शिर्षक गीतामुळे लोकप्रिय झालेली झी मराठीवरील (Zee Marathi) मालिका 'कारभारी लयभारी' (Karbhari Lay Bhari) सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या मालिकेचा विषय आणि यातील पात्रांविषयी सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे त्या त्या वाहिनीवरील अन्य मालिकेतील कलाकार देखील नव्या मालिकांचे प्रमोशन करतानाचा नवा ट्रेंड सुरु झाला आहे. म्हणूनच झी मराठी वरील लोकप्रिय मालिका 'माझ्या नव-याची बायको' (Majya Navryachi Bayko) मधील शनाया (Shanaya) आणि गुरुनाथने (Gurnath) हटके स्टाईल कारभारी लय भारीचे प्रमोशन केले आहे. हे दोघांनी या मालिकेच्या शीर्षक गीतावर भन्नाट डान्स केला आहे.

या व्हिडिओमध्ये रसिका सुनील (Rasika Sunil) आणि अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) कारभारी लयभारी च्या शीर्षकगीतावर थिरकताना दिसत आहे. यात रसिकाने साडी नेसली असून अभिजीत कुर्ता घातला आहे. दोघांनी डोळ्याला गॉगल लावून हा अफलातून डान्स केला आहे. रसिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हेदेखील वाचा- Karbhari Lay Bhari Serial: 'कारभारी लय भारी' मालिकेत कारभारीण बनलेली अनुष्का सरकटे याआधी दिसली होती देवी लक्ष्मीच्या भूमिकेत, वाचा सविस्तर

या मालिकेत अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण (Nikhil Chavan) प्रमुख भूमिकेत दिसत असून या मालिकेच्या प्रोमोवरुन यात पुढे पुढे काय काय घडणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.