'रंग माझा वेगळा' या लोकप्रिय मालिकेमधील 'ही' अभिनेत्री आहे प्रसिद्ध भगरे गुरुजींची कन्या, फोटो पाहून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का!
प्रसिद्ध ज्योतिषी अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी झी मराठी वाहिनीवरील 'वेध भविष्याचा' आणि 'घेतला वसा टाकू नको' या पौराणिक मालिकांमध्ये काम केले आहे.
वेगवेगळे विषय, नवनवे चेहरे यामुळे सध्या स्टार प्रवाहवरील मालिका प्रचंड लोकप्रिय आहेत. यातीलच एक 'रंग माझा वेगळा' (Rang Majha Vegla) ही मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलीय. यातील सर्वच कलाकार दमदार अभिनय करत आहे. दरम्यान यातील नकारात्मक भूमिका साकारणारी श्वेता म्हणजेच अनघा भगरे सध्या चांगलीच चर्चेत आहे. अनघा अतुल भगरे (Angha Atul Bhagare) ही भगरे गुरुजींची कन्या आहे. प्रसिद्ध ज्योतिषी अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी झी मराठी वाहिनीवरील 'वेध भविष्याचा' आणि 'घेतला वसा टाकू नको' या पौराणिक मालिकांमध्ये काम केले आहे.
आपल्यापैकी ब-याच जणांना ही गोष्ट माहिती नसेल. त्यामुळे त्यांना ही बातमी ऐकून कदाचित विश्वास बसणार नाही.हेदेखील वाचा- 'रंग माझा वेगळा' मालिकेतील डॉ. कार्तिक फेम आशुतोष गोखले चा सहअभिनेत्री सोबतचा 'हा' धमाकेदार डान्स पाहून तुम्हालाही वाटेल थिरकावेसे, Watch Video
अनघाचा जन्म 24 जून 19994 रोजी नाशिकमध्ये झाला. तिला लहानपणापासून अभिनयाची तसेच मॉडलिंगची आवड होती. तिने अनेक नाटकांमध्येही काम केले आहे. अनन्या ह्या लोकप्रिय नाटकामध्ये ती साकारत असलेल्या भूमिकेच विशेष कौतुक होत आहे. अनघाने प्रसिद्ध निर्माते आणि अभिनेते महेश कोठारे यांच्या 'कोठारे व्हिजन'मध्ये मॅनेजर म्हणून काम केले होते.
अनघा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोटोज सोशल मिडियावर बरेच व्हायरल होत असतात. तिचे Reels व्हिडिओंचीही चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेज आहे. अलीकडे तिचा वाथी कमिंग गाण्यावरील डान्स व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.