'माझ्या नव-याची बायको' मालिकेतील पिंकी आणि जेनीने 'या रावजी' लावणीवर धरला ठेका, Watch Video
Pinky And Jennie Lavni (Photo Credits: Instagram)

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील 'माझ्या नव-याची बायको' (Majya Navryachi Bayko) सध्या छान रंजक वळणावर आली आहे. त्याला कारणही तसेच आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून राधिका (Radhika) आणि शनायाचा (Shanaya) पिंकी-चिंकीचा खेळ आता खरा सुरु झाला आहे. कारण खुद्द सौमित्रला या पिंकी म्हणून गुरुनाथच्या समोर आणण्यात आले आहे. अलीकडेच सौमित्रने गुरुनाथला पिंकी म्हणून दिलेली चपराक मुळे या पिंकीची सर्वच प्रेक्षक कौतुक करत आहे. त्यातच आता या पिंकीचा म्हणजेच अद्वैत दादरकरचा (Adwait Dadarkar) पिंकी बनून जेनीसोबत केलेली लावणी सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये पिंकी आणि जेनीने 'या रावजी' या गाण्यावर ठेका धरलेला दिसत आहे. 'माझ्या नव-याची बायको' मालिकेमधील माया ऊर्फ रुचिरा जाधव ख-या आयुष्यातही आहे तितकीच 'बोल्ड अँड ब्युटिफूल'; See Hot Photos

पाहा व्हिडिओ:

दरम्यान या मालिकेतील जुनी शनाया (Shanaya) म्हणजेच रसिका सुनील (Rasika Sunil) हिचे या मालिकेत पुनरागमन झाले आहे. तिला पुन्हा मालिकेत आलेले पाहून तिचे चाहते प्रचंड आनंदून गेले आहेत. त्यात रसिका सोशल मिडियावरही बरीच सक्रिय असते. तिच्या फोटोमधील ग्लॅमरस अदा पाहून तिचे चाहते अक्षरश: घायाळ झाले आहेत. नुकतेचे तिने तिचे हॉट फोटो इनस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यात तिचा बोल्ड अंदाज बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकेल असा आहे.