Knock-Knock गँगकडून मनस्वी वशिष्ठ चा मोबाईल फोन चोरीला; अभिनेत्याने शेअर केला अनुभव
सलोनमध्ये जात असताना त्याला फोन चोरीच्या वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. Knock-knock गँगने हा फोन चोरल्याचे अभिनेत्याने सांगितले आहे.
'इश्क में मरजावां 2' (Ishq Mein Marjawan 2) फेम मनस्वी वशिष्ठ (Manasvi Vashist) याचा मोबाईल फोन चोरी झाला आहे. सलोनमध्ये जात असताना त्याला फोन चोरीच्या वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. Knock-Knock गँगने हा फोन चोरल्याचे अभिनेत्याने सांगितले आहे. मालाड येथील एस. व्ही. रोड येथे हा प्रसंग घडला. यासंदर्भात अभिनेत्याने सांगितले की, ट्रॅफिक सिग्नलला उभे असताना एक तरुण आला आणि गाडीचे काहीतरी बिघाड असल्याने मला लगेच गाडीतून खाली उतरण्यास सांगितले. मला काहीतरी गडबड वाटली म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, काहीच मिनिटांनी दुसऱ्या एका व्यक्तीने गाडीची खिडकी नॉक केली आणि बोनेट मधून स्पार्क येत असल्याचे सांगितले. मग मी घाबरलो.
मी बोनेट उघडतो आणि मेकॅनिकला बोलावतो, असेही तो म्हणाला. त्यानंतर त्याने बोनेटमध्ये डोके घालून काहीतरी केले. पण मला ते दिसले नाही. तसंच समस्या तातडीने दूर झाल्याने माझे प्राण वाचल्याचेही तो म्हणाला. त्यानंतर मदतीसाठी मी त्या दोघांचेही आभार मानले. त्यानंतर त्यांनी मला कार चेक करायला सांगितले. मात्र काही वेळाने माझ्या लक्षात आले की, माझा फोन गायब आहे. त्यानंतर मी दोन तास मॅकेनिकला शोधत होतो. त्यानंतर एका मॅकेनिलने मला Knock-knock गँग विषयी सांगितले. या गँगमधील एक व्यक्ती कार ठोठावते आणि तुमचे लक्ष वेधून घेते. तेव्हात संधी साधत दुसरी व्यक्ती तुमच्या वस्तू चोरी करते. मी या शहरात नव्या असल्याने त्यांच्या जाळ्यात सापडलो, असे अभिनेत्याने सांगितले.
मनस्वीने या प्रकाराविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तेव्हा असाच प्रसंग या आधी झाला असून ही गँग फोन ट्रॅक होऊ नये म्हणून फोनचे पार्ट वेगळे करुन विकते, असे पोलिसांनी सांगितले. या गॅंगला पकडण्यात पोलिसांना लवकरात लवकर यश येईल आणि निष्पाप व्यक्ती यांच्या जाळ्यात अडकणार नाहीत, अशी आशा अभिनेत्याने व्यक्त केली आहे.