Kaun Banega Crorepati 13: 1 कोटीसाठी अमिताभ बच्चन यांनी Savita Bhati यांना विचारला 'हा' प्रश्न; उत्तर माहित असूनही नाही मिळाला करोडपती होण्याचा मान
या शो मध्ये विजेता होण्यासाठी ज्ञानासोबतच नशिबाने साथ देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा लोकप्रिय शो कौन बनेगा करोड़पति (Kaun Banega Crorepati 13) मध्ये स्पर्धक सातत्याने आपले नशिब आजमावत आहेत. या शो मध्ये विजेता होण्यासाठी ज्ञानासोबतच नशिबाने साथ देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. असाचा काहीसा प्रसंग यंदाच्या आठवड्यात घडला. राजस्थानच्या जोधपूरची स्पर्धक सविता भाटी (Savita Bhati) या दमदार खेळ खेळत होत्या, आपल्या ज्ञानाच्या जोरावर त्यांनी 50 लाख रुपये जिंकले. त्यानंतर विचारण्यात आलेल्या 1 कोटीच्या प्रश्नावर मात्र त्यांचा आत्मविश्वास हलला. त्यामुळे बरोबर उत्तर माहित असूनही त्यांना करोडपती होण्याचा मान मिळाला नाही. (KBC 13: Suniel Shetty ने शेअर केला Amitabh Bachchan यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा, Watch Video)
सविता भाटी यांच्या दमदार खेळीने अमिताभ बच्चन चांगलेच इम्प्रेस झाले होते. 50 लाखापर्यंत पोहचताना सविता यांच्याकडे एकही लाईफलाईन बाकी नव्हती. त्यामुळे रिक्स न घेता पतीच्या सांगण्यावरुन त्यांनी शो क्विट करणे योग्य समजले. परंतु, शो सोडण्यापूर्वी जेव्हा त्यांना एक उत्तर निवडण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर अचूक ठरले. त्यामुळे शो क्विट नसता केला तर त्यांना करोडपती होता आले असते आणि या सीजनमध्ये 1 कोटी जिंकणारी दुसरी महिला होण्याचा मान मिळाला असता. परंतु, काही वेळेस नशिबाची साथही तितकची महत्त्वाची ठरते.
पहा व्हिडिओ:
या चुरशीच्या लढाईत अमिताभ बच्चन यांनी 1 कोटी रुपयांसाठी विचारलेला प्रश्न असा होता. "पहिल्या महायुद्धादरम्यान तुर्की मध्ये 1915-16 मध्ये भारतीय सेनेचे सुमारे 16000 हून अधिक सैनिकांनी मित्र राष्ट्रांसोबत मिळून बहादुरीने युद्ध कोठे केले होते?" याचे अचूक उत्तर 'गलीपोली' असे होते.