Bigg Boss Marathi 2 Grand Finale Live Updates: शिव ठाकरे ठरला बिग बॉस मराठी 2 च्या विजेतापदाचा मानकरी, नेहा शितोळे हिला मिळाला दुसऱ्या क्रमांचा मान
कलर्स मराठी (Colors Marathi) वरील बहुचर्चित बिग बॉस मराठी सीझन 2 (Bigg Boss Marathi 2) चा महाअंतिम सोहळा (Grand Finale) नुकताच सुरु झाला आहे.आपापल्या आवडीच्या सदस्याला मत देऊन आता सर्व फॅन मंडळी नेमकं जिंकणार कॉमन या उत्सुकतेत आहेत.
-शिव ठाकरे 'बिग बॉस मराठी 2' च्या विजेतापदाचा मानकरी ठरला आहे. शिवचा Finale पर्यंतचा प्रवास खरचं खडतर होता पण प्रेक्षकांची मने जिंकत शिवने बिग बॉसच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. तसेच विदर्भातील एक सामान्य तरुण जो बिग बॉसच्या घरात जायचे स्वप्न पाहत होता, त्याचे हे स्वप्न आज खरचं सत्यात उरताना दिसून आले. तर बिग बॉसची मानाची ट्रॉफी आणि 17 लाख रुपयांची रक्कम मिळवत शिवने बाजी मारली आहे.
-पुण्याची धाडक गर्ल म्हणून ओखळ असणारी नेहा शितोळी हिला दुसऱ्या क्रमांकाचा मान मिळाला आहे. मात्र नेहा हिचा सुद्धा बिग बॉसच्या घरातील एकूणच प्रवास पाहता ती नेहमीच उत्तोमत्तोम खेळण्याचा प्रयत्न करताना दिसून आली. तसेच नेहाने स्पष्टवक्तपणाने आणि कणखरपणे प्रत्येक गोष्टीला समोरी जाण्याची एक वेगळीच ताकद घरात प्रेक्षकांना दाखवून दिली.
महेश मांजरेकर यांनी ज्या व्यक्तीला बिग बॉसच्या शो मधील तडका म्हणून संबोधले होते अशी शिवानी सुर्वे अगदी मोक्याच्या वेळी घरातून आऊट झाली आहे. शिवानीने हट्टापायी घरातून बाहेर पडून पुन्हा प्रवेश घेऊनही तिला अंतिम फेरीत स्थान मिळाल्यावरून अनेकांनी तिच्यावर टीका केल्या होत्या. आता शिवानी घराबाहेर पडल्याने शिव ठाकरे, वीणा जगताप आणि नेहा शितोळे हे फायनल मधील टॉप ३ सदस्य ठरले आहेत.
-बिग बॉसच्या महा अंतिम सोहळ्यात किशोरी शहाणे या घरातून व परिणामी विजेतेपदाच्या स्पर्धेतून बाहेर पडल्या आहेत. अनेकांना किशोरी जिंकतील अशी अपेक्षा असताना पाचव्या स्थानिच त्यांचे एलिमिनेशन झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अभिजित बिचुकले यांनी घरातील स्पर्धकांची लायकी काढल्याचे अनेक प्रसंग आपल्याही लक्षात असतील. पण आज महाअंतिम फेरीतही त्यांनी टॉप 5 मधील सदस्यांना निशाणा करत एक विधान केले आहे. घरात केवळ किशोरी शहाणे आणि शिव हेच आपल्याला फायनलसाठी योग्य दावेदार वाटतात मात्र बाकी सर्व हे कोण आहेत हेच कळात नाही असे म्हणत बिचुकलेंनी पुन्हा सर्वांचा रोष ओढवून घेतला. यावर महेश मांजरेकर, सुरेखा पुणेकर व घराबाहेर पडलेल्या आरोह वेलणकर यांनी त्यांना सुनावले.
बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड म्हणून प्रवेश घेतलेला आरोह वेलणकर महाअंतिम सोहळ्यात घरातून बाहेर पडलेला पहिला सदस्य ठरला आहे. आपल्याला याची कल्पना होती पण इच्छा नव्हती असे म्हणता आरोहने घरातून एग्झिट घेतली आहे. यासोबतच नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, शिव ठाकरे, वीणा जगताप आणि किशोरी शहाणे घरातील टॉप 5 सदस्य ठरले आहेत.
कलर्स मराठी (Colors Marathi) वरील बहुचर्चित बिग बॉस मराठी सीझन 2 (Bigg Boss Marathi 2) चा महाअंतिम सोहळा (Grand Finale) नुकताच सुरु झाला आहे. यंदा शिव ठाकरे (Shiv Thackrey), वीणा जगताप (Veena Jagtap), नेहा शितोळे (Neha Shitole), शिवानी सुर्वे (Shivani Surve) , किशोरी शहाणे (Kishori Shahane) आणि आरोह वेलणकर (Aroha Velankar) हे विजेतेपदासाठीचे टॉप 6 दावेदार ठरले आहेत. यामधून नेमका कोणता सदस्य हा प्रेक्षकांचे प्रेम मिळवत विजयी पदावर आपले नाव कोरतो हे पाहण्यासाठी आता आपल्याला काहीच वेळ वाट बघायची आहे. तत्पूर्वी सोशल मीडिया पासून सर्वत्र मराठी बिग बॉसच्या अंतिम सोहळ्याविषयीच्या चर्चा रंगल्या आहेत. आपापल्या आवडीच्या सदस्याला मत देऊन आता सर्व फॅन मंडळी नेमकं जिंकणार कॉमन या उत्सुकतेत आहेत.
बिग बॉस मराठीचे हे पर्व म्हणजे वादावाद, रंजक टास्क, हटके ट्विस्ट आणि सातशेवटी आलेलं भावनिक स्वरूप यामुळे नेहमीच चर्चेत राहिलं होतं, यंदा वीकेंडच्या वार निमित्त प्रेक्षकांना देखील स्पर्धेत सहभागी करून घेतल्याने रंजकतेत भर पडली होती. या सीझनचा थोडक्यात आढावा घ्याचा झाल्यास शिव वीणाचे प्रेम प्रकरण, शिवानी, नेहा आणि माधव यांचं मैत्रीचं त्रिकुट, अभिजित बिचुकले यांची गाणी, आणि सदस्यांमध्ये उडणारे खटके असे काही मुद्दे खास उल्लेखनीय ठरतात. याशिवाय स्पर्धेच्या उत्तराधार्त घरात वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून आलेला आरोह वेलणकर आणि हट्टापायी घरातून बाहेर जाऊन पुन्हा प्रवेश घेतलेली शिवानी हे देखील भाव खाऊन गेले होते.
बिग बॉस मराठी सीझन 2 Grand Finale
दरम्यान, कोण जिंकणार हा मुद्दा बाजूला ठेवून प्रेक्षकांना आज घरातील टॉप ६ व घराबाहेरील स्पर्धकांनाचे एका पेक्षा एक सादरीकरण पाहायला मिळणार आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)