Bigg Boss Marathi 2 Episode 72 Update: बिग बॉसच्या घरात रंगला कॅप्टनसी टास्क, संचालकाच्या भूमिकेत असलेल्या हिनावर सदस्यांचा राग

ज्यात पूर्व दुश्मन शिव (Shiv Thackrey) आणि आरोहm (Aroha Velankar) यांच्यात वाद पाहायला मिळतात.या आठवड्यात घरव्हेर पडण्यापासून हीना (Heena Panchal) सुरक्षित असल्याने ती या टास्कची संचालक असते. पण टास्क दरम्यान तिच्या गोंधळलेल्या निर्णयांमुळे घरातील सदस्य तिच्यावर रोष धरतात.

Bigg Boss Marathi 2 Episode 72 Update (Photo Credits: Twitter)

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 2)  दुसऱ्या पर्वाचा उत्तरार्ध सुरू होताच घरातील सदस्यांना एकमेकांविषयी आपुलकीने वागण्याचे उशिराने सुचलेले शहाणपण मागील काही भागात पाहायला मिळत आहे. आजच्या भागाची सुरुवात देखील अशीच गोडीगुलाबीने होते. काल विकेंडच्या डाव मध्ये रुपाली भोसले (Rupali Bhosale) घराबाहेर पडल्यावर घरात टॉप 9 सदस्य उरतात, ज्याचा आनंद साजरा करण्यासाठी हे सर्वजण लिव्हिंग एरियामध्ये फुलांच्या पाकळ्यांची सजावट करून आजूबाजूला उभे राहून नाचतात. पण हा आनंद काहीच क्षणापुरताच मर्यादित राहतो. कारण दुसऱ्या दिवशी सकाळीच बिग बॉस तर्फे सदस्यांना खांब खांब हे कॅप्टनसी टास्क सोपवण्यात येते. ज्यात पूर्व दुश्मन शिव (Shiv Thackrey) आणि आरोहm (Aroha Velankar)  यांच्यात वाद पाहायला मिळतात.या आठवड्यात घरव्हेर पडण्यापासून हीना (Heena Panchal)  सुरक्षित असल्याने ती या टास्कची संचालक असते. पण टास्क दरम्यान तिच्या गोंधळलेल्या निर्णयांमुळे घरातील सदस्य तिच्यावर रोष धरतात.

बिग बॉस ने सोपावलेल्या आजच्या टास्क मध्ये सदस्यांना गार्डन एरिया मध्ये एक चौकटीत उभे केले जाते व आजूबाजूला काही खांब उभारले जातात. प्रत्येक वेळी आवाज बेल झाल्यावर सदस्यांना पळत जाऊन हे खांब पकडायचे असतात तसेच आपण त्या जागी पोहचलो हे सूचित करण्यासाठी त्यावर आपल्या नावाचे स्टिकर चिकटवायचे असतात. टास्क दरम्यान सुरुवातीला हीना नियमानुसार एक एक सदस्य अपात्र ठरवते.

यानंतर शिव आणि आरोहच्या वादातून हिनाचा गोंधळ समोर येऊ लागतो. आरोह शिव वर चिटिंग केल्याचा आरोप करत आरडाओरडा करतो यावेळी दोघेही बळाचा वापर करतात ज्यामुळे हिना त्यांना खेळातून बाहेर काढते. या वरून इतर सदस्य हिनाला समजावत असतात. तितक्यात पुन्हा एकदा खेळ सुरू होतो,या वेळेस टास्क दरम्यान वीणा आणि किशोरी यांच्यात झटपट होऊन खांब पडतो आणि यावेळेस हिना बिग बॉसच्या प्रॉपर्टीचे नुकसान झाले असे कारण सांगत त्या दोघींनाही बाद करते. सरतेशेवटी केवळ नेहा खेळात उरते.

दरम्यान या आठडवड्यात बिग बॉस घरातील सर्वच सदस्यांना कॅप्टन पदाची उमेदवारी देऊ करतात. मागील आठवडयात उत्तम सादरीकरण केल्याने हे गिफ्ट देण्यात येते. खरंतर शेवटच्या काही आठवड्यात सुरक्षित ठेवण्यासाठी कॅप्टनशीप मिळवणे अगदीच फायद्याचे होते त्यामुळे सर्वच सदस्य झटत होते पण हिनाच्या गोंधळामुळे आपली संधी निघून गेल्याचा राग आज टास्कच्या शेवटी सर्वांमध्ये दिसून आला