Bigg Boss Marathi 2 Episode 68 Update: शिव- वीणा मध्ये येणार दुरावा? Statue टास्क मध्ये असं काय घडलं की ज्याने ढसाढसा रडली वीणा;जाणून घ्या

बिग बॉसच्या घरात काल घरातील काही सदस्यांना आपल्या जवळच्या व्यक्तीची भेट घेण्याची संधी मिळाली होती हेच सत्र पुढे नेत आजच्या भागातही शिव ठाकरे, वीणा जगताप, अभिजित केळकर यांच्या कुटुंबातील सदस्य घरात पाहुणे म्हणून आले होते. पण आज असे काही घडले की ज्यामुळे वीणाला टास्क दरम्यानच ढसाढसा रडू कोसळले.

Bigg Boss 68 Update ( Photo Credits: Twitter)

बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi 2) घरात काल घरातील काही सदस्यांना आपल्या जवळच्या व्यक्तीची भेट घेण्याची संधी मिळाली होती हेच सत्र पुढे नेत आजच्या भागातही शिव ठाकरे (Shiv Thackrey), वीणा जगताप ( Veena Jagtap) , अभिजित केळकर (Abhijit Kelkar) यांच्या कुटुंबातील सदस्य घरात पाहुणे म्हणून आले होते. खेळाच्या नियमाप्रमाणे घरात बाहेरून कुणी येत असताना घरातील सर्व सदस्यांना फ्रीझ केले गेले होते. पण आज असे काही घडले की ज्यामुळे वीणाला टास्क दरम्यानच ढसाढसा रडू कोसळले. वास्तविक झालं असं की, सुरुवातीला शिवची आई घरात आल्यावर त्यांनी सर्वांची भेट घेतली तसेच त्यांनी वीणाला सुद्धा तू खूप छान खेळत आहेस असे म्हणत प्रोत्साहन दिले मात्र त्यानंतर शिवची बहीण मनीषा हिने घरात एन्ट्री घेताच वीणाला काहीसे दुर्लक्षित केले, इतर सदस्यांना भेटूनही मनीषा वीणाशी फार बोलल्या नाहीत यामुळे वीणाला साईडलाईन केल्याचे वाटून ती रडू लागली. दरम्यान आजच्या भागात शिवच्या आईने आपल्या भाबडेपणाने सर्वांचीच मने जिंकली.

आजच्या भागाच्या सुरुवातीलाच घरातील सदस्य आपल्या जवळच्या व्यक्तीची वाट बघत त्यांना भेटण्यासाठी उत्सुक होते.आज घरात सर्वात प्रथम अभिजित केळकर याच्या मुलांनी येऊन सर्वांना गोड सरप्राईज दिले. यानंतर बिग बॉसने कन्फेशन रूम मध्ये अभिजितला बोलावून त्याला आपल्या पत्नीला सुद्धा भेटण्याची संधी दिली. अभिजीतचे कुटुंब घरातून जाताच शिवची आई घरात येते, घरातील सदस्यांना भेटून तुम्ही शिवला सांभाळून घ्या अशी विनंती करते. हे सर्व सुरू असतानाच शिवची बहीण सुद्धा घरात येते येत्या 15 ऑगस्ट ला असणाऱ्या रक्षाबंधनाच्या आधी शिवला घराबाहेर येऊ लागू नये अशी आशा करत मनीषा त्याला राखी बांधते. हे सर्व सुरू असताना या दोघीही शिवला वारंवार स्वतःच्या बळावर खेळ विणाची बाजू घेताना स्वतःला विसरू नको असा सल्ला देत असतात. कदाचित यामुळेच वाईट वाटल्याने वीणा नंतर रडत असते.

दरम्यान, शिवची आई घराबाहेर पडताच काहीच वेळाने वीणाची आई सुद्धा घरात येते. वीणाची आई सर्वांची भेट घेऊन अगदी अभिजित बिचुकले पासून सर्वांचे कौतुक करते पण शिवानीला समोर पाहताच त्यांचा राग अनावर होतो व शिवानीने वीणा बद्दल चुकीच्या गोष्टी बोलल्यामुळे आपल्याला सुद्धा वाईट वाटले असे त्या शिवानीला सांगतात,  तसेच शिवानीला रोखण्याऐवजी हसत असलेल्या रुपाली वर सुद्धा त्या नाराजी व्यक्त करतात. सर्वांशी बोलून अखेरीस त्या वीणा जवळ पोहचतात मात्र तरीहि बिग बॉस विणाला रिलीज होण्याचे आदेश देत नाहीत म्हणून अगोदरच ती रडत असते. यात भर म्हणून बिग बॉस विणाच्या आईला घरातून बाहेर पडण्यास सांगतात, त्यामुळे वीणाची आपल्या आईशी भेट होणार का हा प्रश्न सरतेशेवटीही अनुत्तरितच राहतो, याचे उत्तर शोधण्यासाठी पाहत राहा आपला मराठी बिग बॉस!

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now