Bigg Boss Marathi 2, Episode 60 Preview: शिवानी धरणार नेहाशी अबोला, साप्ताहिक कार्यात शिव- हीना मध्ये सुद्धा होणार खडाजंगी

बिग बॉसच्या घरात आजच्या भागात घरातील सदस्यांना साप्ताहिक कार्य देण्यात येणार आहे, टास्क दरम्यान शिव आणि हिनामध्ये वाद होतो, तर दुसरीकडे शिवानी आणि नेहाच्या मैत्रीत कटुता आलेली दिसून येईल, आजच्या भागात नक्की काय घडणार हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा आपला मराठी बिग बॉस

Bigg Boss Episode 60 Preview (Photo Credits: Voot)

बिग बॉस (Bigg Boss Marathi 2) च्या घरात कधी कोणामध्ये खटके उडतील याचा अंदाज लागणं जवळपास अशक्यच आहे, त्यातही मागच्या काही भागांपासून घरातील जीवाभावाच्या दोस्तांमध्ये तू तू- मे मे होताना पाहायला मिळत आहे. या भांडणामुळे अगोदरच रुपाली (Rupali Bhosale) - किशोरी (Kishori Shahane)-वीणा (Veena Jagtap) चा ग्रुप फुटला आहे, तर आरोह वेलणकर (Aroha Velankar) च्या एंट्रीपासून नेहा (Neha Shitole), शिवानी (Shivani Surve)  आणि माधव (Madhav Devchake) मध्ये सुद्धा वाद होत आहेत.  याचाच परिणाम की काय, पण आजच्या भागात शिवानी आपण यापुढे नेहाशी बोलणार नसल्याचे माधवला सांगणार आहे. खरतर नेहा ही घरातील सदस्यांसोबत अनेकदा मजामस्ती करते पण तिच्याबाबत कोणी मस्करी केल्यास तिला चटकन राग येतो असे शिवानीचे म्हणणे आहे.  मात्र माधव यावर तिला समजावताना नेहाशी पूर्णतः अबोला ठेवण्यापेक्षा ऑन- ऑफ राहण्याचा सल्ला देतो. जाणून घ्या आज बिग बॉस मध्ये काय घडणार?

voot वरील प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे, आजच्या भागात घरातील सदस्यांना सात/बारा हे साप्ताहिक कार्य देण्यात येणार आहे, यामध्ये नेहमीप्रमाणे बिग बॉस कडून दोन ग्रुप करण्यात येतात. यातील एका ग्रुप मध्ये शिवानी, नेहा , माधव, शिव, रुपाली तर दुसऱ्या ग्रुपमध्ये किशोरी, अभिजित, हीना, आणि आरोह असे विभाजन केले जाते. यामध्ये शिवानीच्या ग्रुपला मुकादमाचे तर रुपालीच्या ग्रुपला कीटकांची भूमिका दिली जाते. मुकादमाच्या शेतात कीटकांचा शिरकाव होण्यापासून रोखणे आणि कीटकांनी शेतात घुसण्याचा प्रयत्न करणे या स्वरूपाचा हा टास्क असू शकतो. या खेळादरम्यान शिव आणि हिना मध्ये पुन्हा वाद होणार आहे. हिना शिवच्या अंगावर पूर्णपणे रेलताना दिसत आहे ज्यावर चिडून शिव तिला सुनावतो. मात्र अभिजित त्याला शांत करून गेमवर लक्ष द्यायला सांगतो.

दरम्यान कालच्या भागात झालेल्या नॉमिनेशन टास्क नंतर या आठवड्यात घरात रुपाली, शिव आणि अभिजित सोडल्यास सर्वच सदस्य घराबाहेर होण्यासाठी नॉमिनेटेड आहेत, तर आजच्या भागातील टास्क मध्ये पुढच्या आठवड्याच्या कॅप्टन पदासाठी उमेदवार निवडीचा टास्क रंगणार आहे, आता आजचा हा खेळ नेमका काय असेल आणि त्यात कोणाचा पगडा भारी ठरतोय हे पाहण्यासाठी तुम्हाला आजचा एपिसोड चुकवून चालणार नाही.



संबंधित बातम्या

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील

New Zealand vs England: आपल्या अंतिम कसोटी सामन्यात टीम साऊदीने केला अनोखा विक्रम