Bigg Boss Marathi 2 Episode 51 Preview: नाराज शिवानी सुर्वेचे वीणा जगतापला खडे बोल, तर कॅप्टन्सी पदासाठी स्पर्धक एकमेकांना घालणार साष्टांग नमस्कार, Watch Video
कॅप्टन्सी पदासाठी आज स्पर्धक एकमेकांसोबत युद्ध नाही, तर एकमेकांना साष्टांग नमस्कार घालत असल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे.
Weekend चा डाव मध्ये बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi2) ची माजी स्पर्धक शिवानी सुर्वे (Shivani Surve) हिचा पुन्हा एकदा बिग बॉस च्या घरात प्रवेश झालाय. हा प्रवेशकाही काळापुरता असला तरीही शिवानी या आठवड्यात बिग बॉस च्या घरात धुमाकूळ घालणार हे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्याची झलक देखील प्रेक्षकांना Weekend चा डाव मध्ये पाहायला मिळाली. यात शिवानीने वीणा जगताप (Veena Jagtap) ने तिच्यावर केलेल्या वक्तव्यावर तिचा चांगलाच समाचार घेतला असून तो केवळ ट्रेलर असून आजच्या भागात तिच्या मनातील सर्व भडास काढणार आहे.
यात वीणा तिची समजूत काढत असून शिवानीने तिला चांगलेच धारेवर घेतले आहे. आजच्या भागात शिवानीच्या रागाचा बांध फुटणार आहे. येथे पाहा व्हिडिओ
तर दुसरीकडे कॅप्टन्सी पदासाठी आज स्पर्धक एकमेकांसोबत युद्ध नाही, तर एकमेकांना साष्टांग नमस्कार घालत असल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे. थोडक्यात आज वीणावर शिवानीची आगपाखड पाहायला मिळणार, तर दुसरीकडे कॅप्टन्सी साठी एकमेकांच्या उरावर बसणारे स्पर्धक आज एकमेकांसमोर लोटांगण घालताना दिसणार आहे.
मागील आठवड्यात वोटिंग लाईन बंद केल्यामुळे कोणीही घराबाहेर गेले नाही. मात्र या आठवड्यात नॉमिनेशन पासून वाचवण्यासाठी कॅप्टन्सी पदाकरिता एकमेकांसमोर साष्टांग नमस्कार घालताना दिसतील.