Bigg Boss Marathi 2 Episode 47 Preview: उद्धट वीणा वर पहिल्यांदाच भडकल्या किशोरी ताई, पार पडणार 'एक डाव भुताचा' साप्ताहिक कार्य

नेहमीप्रमाणे ती जेवणाच्या टेबलवर वीणा ला स्पष्टवक्तेपणा आणि उद्धटपणा या वेगवेगळ्या गोष्टी असल्याचे सांगणार आहे.

Bigg Boss Marathi 2 Episode 47 Preview (Photo Credit : Colors Marathi)

पराग गेल्यानंतर अखेर वीणा, किशोरी आणि रुपाली यांच्या ग्रुपमध्ये पूर्णपणे फुट पडली आहे. पहिल्यापासूनच वीणा आणि शिवची जवळीक रुपालीच्या डोळ्यात सलत होती, याची वेगळी कारणेही असतील. मात्र हीच गोष्ट किशोरीच्या ध्यानात आणून दिल्यावर तीही वीणाच्या विरोधात गेली. अशाप्रकारे या तिघीही आता वैयक्तिकरित्या खेळत आहेत. त्यात आजच्या भागात पहिल्यांदा किशोरीचा पारा वर गेलेला दिसणार आहे. नेहमीप्रमाणे ती जेवणाच्या टेबलवर वीणा ला स्पष्टवक्तेपणा आणि उद्धटपणा या वेगवेगळ्या गोष्टी असल्याचे सांगत भांडणार आहे. (पहा काय होणार आजच्या भागात)

दुसरीकडे परत एकदा खाण्यावरूनच हीना आणि घरातील सदस्यांमध्ये मोठे भांडण होणार आहे. हीनाला भाकरी हवी आहे मात्र, सदस्यांना शिक्षा म्हणून घरातील लक्झरी सामान गेल्याने सगळ्यांची गैरसोय होत आहे. अशात हीनाच्या भाकरी डिमांडमुळे सर्वजणच हीनावर प्रचंड चिडतात. हिथे हिनाचा दृष्टिकोन पूर्णपणे चुकीचा असल्याचे वैशाली सांगते.

आज बिग बॉसच्या घरात ‘एक डाव भुताचा’ हे साप्ताहिक कार्य देखील रंगणार आहे. या टास्कचा परिणाम पुढील आठवड्यातील कप्तानपदावर होणार आहे. थोडक्यात आज बिग बॉसच्या घरात मोठी धमाल आणि राडा रंगणार आहे.



संबंधित बातम्या