Bigg Boss Marathi 2, August 22, Episode 89 Update: बिग बॉसच्या विजेत्याची किंमत ठरली 17 लाख; आरोह, शिव, वीणा आणि किशोरी झाले नॉमिनेटेड

घरातील सदस्यांची सकाळ 90 मधील एका गाण्याने होते. त्यानंतर बिग बॉसकडून घरातील सदस्यांना त्यांचे मूल्यांकन किती आहे हे ठरण्यास सांगितले.

Bigg Boss Marathi 2 (Photo Credits-Twitter)

बिग बॉसचे 2 पर्वाचा प्रवास आता उत्तरार्धाकाकडे वळला आहे. घरातील सदस्यांची सकाळ 90 मधील एका गाण्याने होते. त्यानंतर बिग बॉसकडून घरातील सदस्यांना त्यांचे मूल्यांकन किती आहे हे ठरण्यास सांगितले. हे ठरवण्यासाठी घरातील सदस्यांना रक्कम लिहिलेल्या मुद्रा दिल्या जातात त्यामधून प्रत्येकाला त्यांचे मूल्यांकन करायला सांगितले जाते.  यामध्ये नेहा स्वत:ची  किंमत 5 लाख ठेवते जी दुसरी सर्वात मोठी रक्कम आहे. ही रक्कम ठरवल्यानंतर नेहा तिची बाजू मांडते. तसेच शिवानी तिची किंमत 2 लाख ठरवली असून आरोह याने त्याची किंमत 4 लाख  रुपये ठरवली आहे. परंतु शिव, वीणा आणि किशोरी यांनी मूल्यांकनामधील सर्वात जास्त रक्कम 6 लाख रुपये ठरवली आहे.शिवानी आणि नेहा या दोघींनी शिव हा 6 लाखासाठी योग्य असल्याचे मत सांगतात.

मात्र सर्वांच्या मताने  नेहा 5 लाख, शिवानी 2 लाख, आरोह 4 लाख, किशोरी  3.5 लाख रुपये, वीणा 4.5 लाख आणि शिवसाठी 6 लाख रुपये किंमत ठरवण्यात आली आहे. घरातील नॉमिनेटेड सदस्यांना बिग बॉसकडून एक संधी दिली जाते. तर  नॉमिटेड सदस्यांना फिनालीच्या पर्वात पोहचण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा स्वत:बद्दल अन्य सदस्यांना पटवून द्यायचे आहे. या टास्कदरम्यान शिवानी, नेहा आणि किशोरी यांच्यामध्ये वाद होतात. दरम्यान शिवानी हिने किशोरी यांच्या यापूर्वी केलेल्या चुका दाखवून देत माफी मागा असे रागामध्ये बोलते.(Bigg Boss Marathi 2, Episode 89 Preview: घरातील सदस्य ठरवणार स्वत:च मूल्यांकन, शिवानी सुर्वे हिने ठरवली तिची 2 लाख रुपये किंमत)

आरोह, शिव  आपली मुद्रा मडक्यात टाकतात. परंतु वीणा आणि किशोरी यांच्यामध्ये कोणाला फिनालीसाठी निवडावे यासाठी एकमत न होता उलट वाद झाल्याचे दिसले. तरीही बिग बॉसने घरातील सदस्यांना या दोघींच्या बाबत मत व्यक्त करण्यासाठी बराच वेळ देऊन निर्णय न घेतल्याने तो टास्क रद्द करण्यात आला. यामुळे  बिग बॉसने पुन्हा एकदा घरातील सदस्यांच्या या वागणामुळे खंत व्यक्त केली. परंतु घरातील सदस्यांची एकूणच टास्कदरम्यानच्या वागणुकीवरुन बिग बॉसच्या विजेत्याची किंमत 17 लाख रुपये ठरवण्यात आली आहे.