Bigg Boss Marathi 2, 28 July, Episode 64 Updates: शिवानी आणि वीणामध्ये शीतयुद्ध; माधव देवचके या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर
शिक्षा म्हणून तिला गायला सांगतात. त्यानंतर चुगली बूथ सुरु होते. शिवानीला माधवची चुगली ऐकवून एलिमिनेशनला सुरुवात होते. अगदी धक्कादायकरित्या माधव देवचके या आठवड्यात घरातून बाद होतो
बिग बॉसच्या कालच्या भागापासून वीकएंडच्या डावाला सुरुवात झाली आहे. आजच्या भागाची सुरुवात होते ती नेहाला समजावण्यापासून. स्वतःमधील चुका इतरांनी दाखवून दिल्यावर ज्या प्रकारे तिचा आत्मविश्वास कमी झाला आहे, तो वाढवण्यासाठी तिला सल्ला दिला जातो. त्यानंतर अभिजित ज्या प्रकारे खेळ खेळतो त्याचे प्रात्यक्षिक दाखवले जाते. पुढे शिवानी आणि हीना यांच्या गॅस भांडणाबद्दल स्पष्टीकरण ऐकले जाते. शिवानीने गॅसवर पाणी तापवल्यावर गॅस बंद झाला होता, याचा राग हीनाच्या मनात होता. त्याबद्दल तिची नक्की चूक कुठे होते हे तिला सांगितले जाते.
त्यानंतर कानउघडणी या एका मजेशीर खेळाला सुरुवार होते. इथे एक कानाचा पुतळा ठेवला जातो व त्यात प्रत्येकाला आपल्याला हव्या त्या सदस्याची कानउघडणी करण्याची संधी दिली जाते. आरोह करतो शिवची, हीना करते शिवानीची, नेहा करते माधवची, किशोरी रुपालीची कानउघडणी करते, रुपाली करते वीणाची, माधव करतो अभिजितची, अभिजित करतो शिवानीची, शिवानी करते वीणाची, शिव करतो हीनाची तर वीणा करते स्वतःची. त्यानंतर विविध संकेतावरून गाणे ओळखायचा खेळ सुरु होतो.
त्यानंतर नेहमीप्रमाणे एक चाहता येऊन शिवानीला दोषी ठरवले जाते. शिक्षा म्हणून तिला गायला सांगतात. पुढे चुगली बूथ सुरु होते. शिवानीला माधवची चुगली ऐकवून एलिमिनेशनला सुरुवात होते. अगदी धक्कादायकरित्या माधव देवचके या आठवड्यात घरातून बाद होतो. घरातील सर्वजण अगदी रडून माधवला निरोप देतात. जाता जाता माधव बिग बॉसने दिलेल्या अधिकारामुळे पुढच्या आठवड्यासाठी नेहाला सुरक्षित करतो.