Bigg Boss Marathi 2, 1 July, Episode 37 Updates: बिग बॉस मराठी 2 च्या घरात कॅप्टन्सी टास्क दरम्यान नेहा शितोळे आणि सुरेखा पुणेकर मध्ये शाब्दिक चकमक, माधव देवचक्के नवा कॅप्टन
या कार्यात कॅप्टन पदाचे उमेदवार स्विमिंग पूलमध्ये एका पाईपवर उभे होते. बाकीच्या सदस्यांनी मोठे चेंडू आणि पिचकारीच्या सह्याने उमेदवारांना (कॅप्टन पद) पोलवरुन खाली उतरवायचे होते. या खेळात अखेर विणा पोलवरुन खाली पडली आणि माधव या आठवड्यात कॅप्टन झाला.
Bigg Boss Marathi 2, 1st July, Episode 37 Updates: कॅप्टन पदासाठी झालेल्या टास्कवेळी कार्यसंचालक सुरेखा पुणेकर आणि कार्यसदस्य नेहा शितोळे यांच्यात लुटुपुटुची जोरदार लढाई पाहायला मिळाली. याला बिग बॉसच्या घरातील भांडण असेही म्हणता येईल. कॅप्टनसीसाठी कार्य पार पाडत असताना विरोधी टीम सदस्याला (वीणा जगताप) पराभूत करण्यासाठी नेहा हीने आपल्या पिचकारीत साबण टाकला होता. जेणेकरुन वीणा घसरावी. मात्र, या आधी घरात घडलेल्या आणि त्यातही सुरेखा पुणेकर संचालिका असताना टास्कवेळी घडलेल्या प्रकारामुळे पुणेकर या वेळी सावध होत्या. त्यामुळे त्यांनी कोणतीही रिस्क नको असे म्हणत नेहाला आपल्या पिचकारीतून साबण काढायला लावला. या वेळी नेहा साबण काढ.. नेहा साबण काढ असे म्हणत सुरेखाताई आक्रमक राहिला. त्यावर नेहाही तिककीच आक्रमक पाहायला मिळाली.
माधव देवचक्के या आठवड्यासाठी कॅप्टन
बिग बॉसने या आठवड्यासाठी कॅप्टन पदासाठी दिलेल्या कार्यात उमेदवार माधव देवचक्के आणि वीणा जगताप यांच्यात बऱ्यापैकी लढत झाली. या कार्यात कॅप्टन पदाचे उमेदवार स्विमिंग पूलमध्ये एका पाईपवर उभे होते. बाकीच्या सदस्यांनी मोठे चेंडू आणि पिचकारीच्या सह्याने उमेदवारांना (कॅप्टन पद) पोलवरुन खाली उतरवायचे होते. या खेळात अखेर विणा पोलवरुन खाली पडली आणि माधव या आठवड्यात कॅप्टन झाला.
टीम ए कडून विणा टीम बी कडून माधव देवचक्के
शिव ठाकरे याचा कॅप्टनसीचा कार्यकाळ संपला आणि नव्याने कॅप्टन पदासाठी टीम ए आणि टीम बी मधून उमेदवार सूचवण्यात आले. टीम ए कडून वीणा जगताप तर, टीम बी मधून टीम माधव देवचक्के याची टीम सदस्यांनी निवड केली.
सुरेखा पुणेकरांचा टीम सदस्यांना रोकडा सवाल
या वेळी कॅप्टन पदासाठी कोण उमेदवार द्यायचा यावर चर्चा सुरु होती. नेहमीप्रमाणे अभिजित केळकर कॅप्टन आपणच व्हावे असे आपल्या बोलण्यातून व्यक्त करत होता. पण, कॅप्टन पदासाठी आपणच नेहमी दावेदारी करणं हे हवरटपणाचे ठरेल हे ध्यानात येताच केळकर महोदयांनी शब्द आवरते घेतले आणि आपण माधवला कॅप्टनसीचा उमेदवार करुया हे असे म्हटले. पण, यावर 'तुम्ही मला कधी कप्तान करणार' असा रोखडा सवाल सुरेखा पुणेकर यांनी विचारला. सुरेखा पुणेकर यांनी अचानक विचारलेल्या या प्रश्नामुळे सगळेच काहिसे गोंधळून गेले. पण, माधवने तांत्रिक अडचणस समजून सांगताच पुणेकर यांचे समाधान झाल्याचे पाहायला मिळाले.
बिग बॉसची नवी गेम.. सदस्यांनी केले एकमेकांना नॉमिनेट
आजच्या एपिसोडमध्ये कॅप्टनसी कार्य पार पडल्यानंतर बिग बॉसने एक वेगळाच गेम केला. सर्व सदस्यांना दोन सदस्यांना नॉमिनेट करायचे होते. बहुतांश सदस्यांनी एकमेकांना नॉमिनेट केले. दरम्यान, एकमेकांना नॉमिनेट केल्यामुळे घरातील सदस्यांमध्ये भांडणे लागतील हे नक्की. (हेही वाचा, Bigg Boss Marathi 2, Episode 37 Preview: नॉमिनेशन टास्क दरम्यान सुरेखा पुणेकर आणि नेहा शितोळे यांच्यामध्ये बाचाबाची; पहा कोण होणार नॉमिनेट)
नॉमिनेट झालेले सदस्य
दरम्यान, या वेळी सदस्यांनीच एकमेकांना नॉमिनेट केले त्यानुसार हिना पांचाळ, रुपाली भोसले, वैशाली माडे, सुरेखा पुणेकर, किशोरी शहाणे विज हे स्पर्धक या आठवड्यासाठी नॉमिनेट झाले.