Bigg Boss 14: सलमान खान च्या लग्नाबाबत जनार्दन बाबांनी सांगितलेली भविष्यवाणी ऐकून भाईजान लागला नाचायला, पाहा काय म्हणाले ते

मग काय आता माझा लग्नाचा योग निघून गेला आहे का? यावर बाबा म्हणाले हो तुझा लग्नाचा योग निघून गेला आहे.

Salman Khan (Photo Credits: Colors)

हिंदी वाहिनी कलर्सवरील (Colors TV) लोकप्रिय शो बिग बॉस चा 14 (Bigg Boss 14) व्या सीजनाचा ग्रँड प्रीमिअर काल (3 ऑक्टोबर) दणक्यात पार पडला. या शो मध्ये सलमान खान (Salman Khan) ची एन्ट्री झाल्यानंतर या कार्यक्रमात जीव आणला असे म्हणायला हरकत नाही. त्यात या कार्यक्रमात अभिनेता एजाज खान (Ejaz Khan) आणि निक्की तंबोलीची (Nikki Tamboli) एन्ट्री झाली. या दोघांच्या एन्ट्रीनंतर खूप मजा मस्ती सुरु झाली. ज्यामुळे या मंचावर चांगले वातावरण तयार झाले. यात निक्कीचे बोलणे ऐकून सलमान हैराण झाला. या दरम्यान पाहुणे म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आलेले फेस रीडर जनार्दन बाबांनी (Janardan Baba) निक्की आणि एजाजबद्दल भविष्यवाणी सांगितली. दरम्यान सलमानच्या लग्नाबाबत देखील भविष्यवाणी सांगताच सलमान अचानक जोशात नाचू लागला.

झाले असे की, सलमान खान ने जनार्दन बाबांना विचारले की, तुम्ही 6 वर्षांपूर्वी मला सांगितले होते की, तुमचे पुढच्या वर्षी लग्न होईल. मग काय आता माझा लग्नाचा योग निघून गेला आहे का? यावर बाबा म्हणाले हो तुझा लग्नाचा योग निघून गेला आहे. Bigg Boss 14 च्या घरात पहिल्या दिवशी झाली जबरदस्त कॅटफाईट, भांड्यांच्या कामाला घेऊन जैस्मिन आणि निक्कीमध्ये झाली तूतू-मैंमैं

 

View this post on Instagram

 

❤️ if you're ready to WATCH FROM HOME! #BB14 #BiggBoss2020 #BiggBoss14 #BB14GrandPremiere @BeingSalmanKhan

A post shared by Colors TV (@colorstv) on

जनार्दन बाबांचे हे उत्तर ऐकून सलमान अगदी बेधुंद होऊन नाचू लागला. या दरम्यान सलमाननेही जनार्दन बाबांच्या 8 मुलांना घेऊन त्यांची खूप मस्करी केली. सलमानचा हा अंदाज ज्यांनी ज्यांनी पाहिला ते पाहून लोटपोट हसू लागले असतील हे मात्र नक्की.

यंदाच्या सीजनमध्ये आधीच्या सीजनमधील चर्चेत आलेले 2 विजेते आणि 1 रनरअप देखील आहे. ज्यांची नावे आहेत सिद्धार्थ शुक्ला, गौहर खान आणि हिना खान. सलमानच्या म्हणण्यानुसार या घरातील स्पर्धकांचे झोपण्यापासून खाण्यापिण्यापर्यंत सगळ्याला हे जबाबदार असतील. या तिघांची हुकूमशाही सुरुवातीचे 2 आठवडे चालेल. कारण यांना प्रभावित करणा-या स्पर्धकांनाच घरात प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे नक्की या सीजनमध्ये काय काय घडणार हे येणा-या काही दिवसांत कळेलच