Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मालिकेतील 'टप्पू' उर्फ Bhavya Gandhi याची वडीलांसाठी भावूक पोस्ट

आपल्या वडीलांच्या आठवणीत भव्यने एक भावूक पोस्ट केली आहे.

Bhavya Gandhi Emotional Post for father (Photo Credits: Instagram)

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta Ka Ulta Chashma) मालिकेतील 'टप्पू' उर्फ भव्य गांधी (Bhavya Gandhi) याच्या वडीलांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले. आपल्या वडीलांच्या आठवणीत भव्यने एक भावूक पोस्ट केली आहे. यात त्याने वडीलांना कोरोना कधी झाला हे सांगत वडीलांबद्दल काही गोष्टी शेअर केल्या आहेत. तसंच लस घेण्याची विनंती नागरिकांना केली आहे. त्याचबरोबर वडीलांवर उपचार करणारे डॉक्टर्स, आरोग्य कर्चमारी आणि मदतीसाठी धावून आलेला सोनू सूद यांचे आभार मानले आहेत. 'तुमची कायम आठवण येईल', असं कॅप्शन देत भव्यने ही पोस्ट शेअर केली आहे.

पोस्टमध्ये भव्यने लिहिले, "माझ्या वडीलांना 9 एप्रिल रोजी कोरोनाचे निदान झाले. तेव्हापासून ते डॉक्टरांच्या निगराणीखाली असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरु होते. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत कोविडचा पूर्ण क्षमतेने सामना केला. त्यांनी कोविडशी एका राजाप्रमाणे लढा दिला, पूर्णपणे काळजी घेऊनही त्यांना कोविडने ग्रासले. माझ्या आयुष्यातील सर्वात चांगल्या गोष्टींसाठी ते कारणीभूत आहेत."

पुढे तो लिहितो, "तुम्ही सर्वांनी लस घ्या अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तसंच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. जीवघेण्या व्हायरसवर मात करण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे लस घेणे." (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मालिकेतील 'टप्पू' उर्फ Bhavya Gandhi याच्या वडीलांचं कोरोनामुळे निधन)

Bhavya Gandhi Post:

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhavya Gandhi (@bhavyagandhi97)

पुढे त्याने त्याच्या वडीलांवर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसंच आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल अभिनेता सोनू सूद सह इतर काहीजणांनाही त्याने धन्यवाद दिले आहेत. कठीण काळात साथ दिलेल्या कुटुंबियांचे देखील त्याने आभार मानले आहेत.

"तुम्ही जिथे कुठे असाल तिथे खुश असाल. सगळं काही शिकवल्याबद्दल धन्यवाद पप्पा," असं म्हणत वडीलांचा फोटो शेअर करत भव्य ने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.