Stree 2 Box Office Collection: श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, 360 कोटींहून अधिकची कमाई

हा चित्रपट 2024 चा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. 'स्त्री 2' ने दुसऱ्या शनिवारी 33.80 कोटींची कमाई करत अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढत इतिहास रचला होता.

Photo Credit- X

Stree 2 Box Office Collection: श्रद्धा कपूर()आणि राजकुमार राव(Rajkummar Rao) यांचा 'स्त्री 2' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट 2024 मधला पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. 'स्त्री 2' ने दुसऱ्या शनिवारी 33.80 कोटींची कमाई करत अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढत इतिहास रचला होता. आश्चर्यकारक म्हणजे चित्रपटाने मोठमोठे चित्रपट 'गदर 2' (31.07 कोटी), 'जवान' (30.10 कोटी), 'बाहुबली 2' हिंदी (26.50 कोटी), 'द काश्मीर फाइल्स' (24.80 कोटी), 'पठाण' (22.50 कोटी), आणि ' KGF 2' हिंदीच्या चित्रपटांना दुसऱ्या शनिवारच्या कमाईत मागे टाकले आहे. (हेही वाचा:PM Narendra Modi नंतर Priyanka Chopra ला Shraddha Kapoor ने मागे टाकलं; ठरली भरतातली सर्वाधिक इंस्टाग्राम फॉलोअर्स असलेली अभिनेत्री )

चित्रपट समिक्षकांच्या मते 'स्त्री 2' रविवार किंवा सोमवारपर्यंत 400 कोटींचा टप्पा पार करण्यासाठी सज्ज आहे. चित्रपटाला मिळालेले यश आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहून हा चित्रपट लवकरच 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल अशी आशा आहे. दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने शुक्रवारी 19.30 कोटी आणि शनिवारी 33.80 कोटींचा व्यवसाय केला. चित्रपटाची आतापर्यंत एकूण कमाई 360.90 कोटी रुपये झाली आहे.

'स्त्री 2' ची 400 कोटींच्या दिशेने वाटचाल

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

दरम्यान, सध्या श्रद्धा कपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा म्हणजे तिचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स वाढले आहेत. तिच्या फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ती मोस्ट पॉलोअर्समध्ये सेलिब्रीटींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. याआधी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आत प्रियंका चोप्राला मागे टाकले आहे.