'Dabangg 3' चं टायटल ट्रॅक रिलीज करताना सलमान खानने वापरला हा अनोखा फंडा; पाहा व्हिडिओ

'हूड हूड दबंग' हे गाणं सलमानने सिनेमाच्या प्रदर्शनाच्या बरोबर 50 दिवस अगोदर रिलीज करताना उलटी गणती सुरु केली आहे.

Salman Khan | (Twitter)

सलमान खानच्या (Salman Khan) 'दबंग 3' (Dabangg 3) चा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि अपेक्षेप्रमाणे त्याला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला. आता सलमानने या सिनेमाचं टायटल ट्रॅक प्रदर्शित करताना मात्र एक नवीन फंडा काढला आहे. दबंग 3 च्या प्रमोशन साठी सलमान कोणतीच कसर सोडायला तयार नाहीये.

नेहमीप्रमाणे गाण्याचा व्हिडिओ शेयर न करता त्याने या टायटल सॉंगचा फक्त ऑडिओ शेयर केला आहे. 'हूड हूड दबंग' हे गाणं सलमानने सिनेमाच्या प्रदर्शनाच्या बरोबर 50 दिवस अगोदर रिलीज करताना उलटी गणती सुरु केली आहे.

सलमानचे सिनेमे हे पूर्ण फॅमिलीने सोबत बसून बघावे आणि मजा घ्यावी असे असतात. तसेच त्याच्या सिनेमाच्या गाण्यांबाबतही म्हणता येईल. दबंग मधली गाणीही विशेष गाजली होती. 'तेरे नैना दगाबाज रे' हे गाणं तर अजूनही बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतं. तसेच 'हूड हूड दबंग' हे सुखविंदर सिंगने गायलेलं गाणंही प्रेक्षकांना खूप आवडलं होतं. आता हेच गाणं या भागात नव्या रूपात तयार करण्यात आलं आहे. हे गाणं शबाब सबरी, दिव्या कुमार आणि साजिदने गायलं आहे. तर संगीत पहिल्या भागाप्रमाणेच साजिद-वाजिदने दिले आहे. शब्द जलिस शेरवानी दानिश साबरी यांचे आहेत. निर्मिती टी सीरिजने केली आहे.

'दबंग 3' हा 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif