Sacred Games Season 2 टीझर : नेटफ्लिक्सवर पुन्हा रंगणार गणेश गायतोंडेचा थरार
Sacred Games Season 2 चा टीझर आला,पण रीलिज डेट अजूनही गुलदस्त्यातच
नेटफ्लिक्सवरील पहिली भारतीय वेब सीरीज सेक्रेट गेम्सला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. पहिल्या भागाच्या तुफान प्रसिसादानंतर चाहत्यांनी पुढील सीरीजची मागणी केली होती. आता सेक्रेट गेम्सच्या चाहत्यांसाठी खूषखबर आहे. गॅंगस्टर गणेश गायतोंडे आणि मुंबई पोलिस अधिकार्यामधील खिळवून ठेवणार युद्ध प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. आता पुन्हा नव्या अंदाजात हे गॅंगवॉर रंगणार आहे.
सेक्रेट गेम्स 2
नेटफ्लिक्सने सेक्रेट गेम्स 2 लवकरच येणार असल्याची घोषणा केली आहे. त्याचा टीझर रीलिज करण्यात आला आहे. गणेश गायतोंडे परत येणार आहे. अनुराग कश्यप, विक्रामादित्य मोटवाणी यांनी या वेब सीरीजचं दिग्दर्शन केलं आहे. ही मालिका विक्रम चंद्रांच्या 'सेक्रेड गेम्स' या कादंबरीवर आधारित आहे.
गणेश गायतोंडे परत येणार
गणेश गायतोंडे हे सेक्रेट गेम्स 1 मधील महत्त्वाचं पात्र पहिल्या सीरीजमध्ये स्वतःवर गोळ्या झाडताना दाखवलं आहे. मात्र आता दुसर्या भागात त्याची एन्ट्री कशी होणार? हे कथानक पुढे कसं जाणार ? हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.
गणेश गायतोंडे हे सेक्रेड गेम्समधील महत्त्वाचं पात्र अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकी साकारत आहे. या वेबसीरीजमध्ये नवाझ, सैफ अली खान, राधिका आपटे या कलाकारांसोबतच जितेंद्र जोशी, नेहा शितोळे ही मराठी कलाकार मंडळी लहानशा पण लक्षात राहील अशा भूमिकेत दिसणार आहेत.