Mirzapur 2 Release Date: मिर्जापुर 2 साठीची प्रतिक्षा संपली; 'या' दिवशी Amazon Prime वर होणार रिलीज

'मिर्जापुर 2' (Mirzapur 2) साठी प्रतिक्षेत असणार्‍या मंंडळींसाठी एक खुशखबर समोर आली आहे, सीरीज च्या निर्मात्यांकडुन देण्यात आलेल्या माहितीनुसार येत्या 23 ऑक्टोबर रोजी अ‍ॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) वर रीलीज केली जाणार आहे

Mirzapur 2 Release Date (Photo Credits: Youtube)

'मिर्जापुर 2' (Mirzapur 2) साठी प्रतिक्षेत असणार्‍या मंंडळींसाठी एक खुशखबर समोर आली आहे, सीरीज च्या निर्मात्यांकडुन देण्यात आलेल्या माहितीनुसार येत्या 23 ऑक्टोबर रोजी अ‍ॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) वर रीलीज केली जाणार आहे. या सीरीजची शुटींग फार आधीच पुर्ण झाली होती. मात्र प्रोडक्शनचे काम लॉकडाउन मुळे अ‍डकुन पडले होते. दरम्यान सीरीज मधील कलाकार अली फझल (Ali Fazal) याच्या आईचे सुद्धा निधन झाल्याने त्याला डबिंग साठी येणे शक्य नव्हते मात्र सर्व संकटांंना मागे टाकत सीरीजच्या कलाकारांनी डबिंंगला सुरुवात केली आहे.लवकरच मिर्जापुर 2 सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तुम्ही या सीरीजचा पहिला भाग अजुनही पाहिला नसेल, तर थोडक्यात माहिती अशी की,उत्तर प्रदेश मधील मिर्जापुर येथील ही कहाणी आहे. कालीन भैया म्हणुन पात्राच्या भोवती हे कथानक आहे, हा कालीन स्वतःला किंग ऑफ़ मिर्ज़ापुर समजत असतो. कालीन च्या मुलाने गुड्डु पंंडित याच्या प्रेयसी व भावाला ठार केले असते ज्याचा बदला घेण्यासाठी या सीझन मध्ये गुड्डु पंंडित कालीन ला नडणार आहे.

मिर्जापुर 2 कधी रिलीज होणार?

कालीन च्या भुमिकेत पंंकज त्रिपाठी पाहायला मिळत आहेत तर सीरीज मध्ये अली फजल, देव्यंदू शर्मा आणि विक्रांत मेसी,श्वेता त्रिपाठी, शीबा चड्ढा, आणि रशीका दुग्गल यांंच्या प्रमुख भुमिका आहेत.