Mimi Chakraborty Harassed By Cab Driver: अभिनेत्री व खासदार मिमी चक्रवर्ती यांंना अश्लील इशारे केल्याने टॅक्सी ड्राईव्हर ला अटक

बंगाली अभिनेत्री आणि खासदार मिमी चक्रवर्ती (Mimi Chakrobarty) यांंना अश्लील इशारे करणार्‍याला कोलकाता पोलिसांंनी (Kolkata Police) अटक केल्याचे समजत आहे.

Mimi Chakrobarty (Photo Credits: Instagram)

बंगाली अभिनेत्री आणि खासदार मिमी चक्रवर्ती (Mimi Chakrobarty)  यांंना अश्लील इशारे करणार्‍याला कोलकाता पोलिसांंनी (Kolkata Police) अटक केल्याचे समजत आहे. मिमी यांंनी पोलिसांंकडे रीतसर तक्रार केल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार या टॅक्सी ड्राईव्हरचे नाव लक्ष्मण यादव असे आहे, मिमी या कोलकाताच्या बालीगंंज येथे कार ने जात होत्या यावेळी या टॅक्सी ड्राईव्हरने त्यांंच्याकडे पाहुन अश्लील इशारे केले होते, योगायोग म्हणजे याच ड्राईव्हर ने यापुर्वी सुद्धा मिमी जिम मधुन घरी जात असताना त्यांंना भर रस्त्यात असे इशारे केले होते त्यावेळी मिमी यांंनी त्याच्या या वर्तणुकीकडे लक्ष दिले नाही मात्र कदाचित त्यामुळेच त्याची हिमंंत वाढली आणि यावेळेस जेव्हा त्या स्वतःच्या गाडीतुन निघाल्या तेव्हाही या ड्राईव्हरने त्यांंना त्रास दिला.

मिमी यांंनी पोलिसात दिलेल्या तक्रारी नुसार, आपल्या गाडीतुन ड्राईव्ह करत असताना लक्ष्मण यादव याने आपल्या टॅक्सीने मिमी यांंच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि बराच वेळ असे होत असताना शेवटी मिमी यांंनी त्याला पुढे जाऊ दिले आणि मग त्याचा पिच्छा करत त्याला पकडुन दिले.

MiMi Chakrobarty Instagram 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mimi (@mimichakraborty) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Mimi (@mimichakraborty) on

मिमी यांंनी पोलिसांत तक्रार करताना म्हंटले की अशा लोकांंना सोडुन देणे म्हणजे पुढे अन्य अनेक महिलांंवर अन्यायाला यांंना प्रोत्साहन देणे आहे, पोलिसांंनी सध्या लक्ष्मण यादव याला अटक केली असुन त्याच्या वर इंंडियन पेनल कोड नुसार कलम 345, 354A, 354D, 509 अंंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली