Hiramandi Season 2: 'मेहफिल फिरसे जमेगी' हिरामंडी सिजन 2 लवकरच प्रेक्षकांचा भेटीला, दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्याकडून घोषणा; शेअर केली पोस्ट
नेटफ्लिक्सवर नुकतीच प्रदर्शित झालेली हीरामंडी या वेब सिरीनंतर हीरामंडी २ ची घोषणा करण्यात आली आहे.
Hiramandi Season 2: नेटफ्लिक्सवर नुकतीच प्रदर्शित झालेली हीरामंडी या वेब सिरीनंतर हिरामंडी 2 ची घोषणा करण्यात आली आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Lila Bhansali) यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली आहे. हिरामंडी 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. पहिल्या सिरीजला मिळालेल्या भरघोष यश नंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा- संजय लीला भन्साळी यांची महत्त्वाकांक्षी OTT मालिका 'हिरामंडी: द डायमंड बझार' 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित
नेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्रामच्या अधिकृत अॅकाऊटवर दुसऱ्या भागाची एक झलक दाखवण्यात आली आहे. 'मेहफील फिसरे जमेगी, हिरामंडी सिजन 2 जो आयेगा' असं या पोस्टवर लिहण्यात आले आहे. अनेक युजर्संनी या पोस्टवर कमेंट केले आहे. टीममधील सर्व कलाकारांनी खास अंदाजात दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. सिरीजमध्ये असलेल्या सर्व गाण्यांवर फ्लॅशमॉब सादरीकरण केले आहे. हे पाहण्यासाठी नागरिकांनी देखील गर्दी केली आहे. सर्व कलाकार मरीन ड्रायव्हवर मनोसोक्त सादरीकरण करताना दिसत आहे.
ही सीरिज बनवण्यासाठी 200 कोटी रुपये खर्च आला आहे. सिरीजचा दुसरा भाग पाहण्यासाठी प्रेक्षकांना आतुरता लागली आहे. ही सिरीज कधी प्रदर्शित होईल या बाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. वेब सीरिजमध्ये अनेक कलाकरांना प्रेक्षकांकडून पसंती मिळाली आहे तर काही कलाकारांना नापसंती मिळाली आहे.