Eka Makdane Kadhale Dukan: ‘एका माकडाने काढले दुकान’ गाण्यावर सुहाना खानचा डान्स पाहून सलील कुलकर्णीने लिहली मजेशीर पोस्ट
‘द आर्चीज’ चित्रपटातील सुहाना खानच्या डान्सच्या मागे ‘एका माकडाने काढले दुकान’ हे गाणं लावून भन्नाट एडिट केलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हाच व्हिडीओ शेअर करत सलील कुलकर्णींनी पोस्ट लिहिली आहे.
गायक, संगीतकार सलील कुलकर्णी (Saleel Kulkarni) सोशल मीडियावर (Socail Media) खूप सक्रिय असतात. नुकतीच त्यांनी ‘एका माकडाने काढले दुकान’ या गाण्यासंबंधित पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल (Viral Post) झाली आहे. या व्हिडिओमध्ये ‘द आर्चीज’ चित्रपटातील सुहाना खानच्या डान्सच्या मागे ‘एका माकडाने काढले दुकान’ हे गाणं लावून भन्नाट एडिट केलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हाच व्हिडीओ शेअर करत सलील कुलकर्णींनी पोस्ट लिहिली आहे.
पाहा पोस्ट -
View this post on Instagram
सलील कुलकर्णी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिल, “‘एका माकडाने काढले दुकान..आली गिऱ्हाईके छान छान’ विंदांच्या या कवितेचं मी 1999 मध्ये गाणं केलं होतं…आत्ताची धृपद गायिका मेघना सरदार तेव्हा १०-११ वर्षांची होती, तिने ते गायलं होतं…लहान मुलांच्या अनेक पिढ्यांनी हे मनापासून ऐकलं…दाद दिली…नंतर अनेक युट्यूब चॅनलने याचे उथळ हिंदी भाषांतर करून माझ्याच चालीत रिलीज केलं…मी अर्थातच निषेध सुद्धा नोंदवलेला नाही…मग हळूहळू मराठीतल्या पण अनेक युट्यूब चॅनलने विंदा किंवा माझा उल्लेख न करता ते वाजवले, त्याचा व्हिडिओ केला. मी पुन्हा एकदा जगभरातील मुलांनी ऐकलं …त्यांना आवडलं हे खूप आहे, असा समजूतदार (खरं तर बावळट आणि आळशी) धोरण स्वीकारलं…, आता काही दिवसांपूर्वी हे गाणं या धमाल एडिटिंग सकट बघायला मिळालं…ते सुद्धा व्हायरल झालं..आता तर मी निषेध वगैरे ओलांडून…हसण्याच्या स्टेजला आलो आहे… विंदांच्या घरी बसून त्यांना हे गाणं ऐकवलं होतं…त्यांनी हा व्हिडिओ पाहिला असता तर ‘माझ्या मना बन दगड’ नावाची त्यांची कविता ऐकावयाला त्यांना अजून एक कारण सापडले असते…तर ‘एका माकडाने काढले दुकान’ या गाण्याचा प्रवास गमतीशीर चालू आहे…आजची छोटी मुलं सुद्धा ते गाणं ऐकतायत…विंदा….आपलं गाणं हिट आहे…”
(The above story first appeared on LatestLY on Jan 09, 2024 01:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

