Sai Lokur ने सोशल मिडियावर शेअर केले पती तीर्थदिप रॉयसह काढलेले Night Suit मधील Cute फोटोज, See Pics
नाइट स्यूटमधील सई आणि तीर्थदिपचे हे रोमँटिक फोटोज चाहते प्रचंड पसंत करत आहे. यात एका फोटोत तर तीर्थदिपने सईला खांद्यावर लहान मुलासारखे उचलून घेतले आहे.
मराठीतील एक बिग फॅट लग्न नुकतेच पार पडले. अभिनेत्री सई लोकुर (Sai Lokur) आणि तीर्थदिप रॉय (Tirthdeep Roy) यांचे नुकतेच लग्न झाले. अगदी थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर सई लोकुर आपल्या संसारात छान रमली असून तिने लग्नानंतरचे आपले पोस्ट फोटोशूटही केले आहे. यात तिने नुकतेच आपल्या पती तीर्थदिपसोबत नाइट ड्रेसमधील (Sai Lokur-Tirthdeep Roy Night Suit Photos) फोटोज शेअर केले आहेत. यात हे जोडपं खूपच क्युट दिसत आहे. या फोटोमध्ये सई आणि तीर्थदिपने अंतरंगी हावभाव देखील दिले आहेत.
नाइट स्यूटमधील सई आणि तीर्थदिपचे हे रोमँटिक फोटोज चाहते प्रचंड पसंत करत आहे. यात एका फोटोत तर तीर्थदिपने सईला खांद्यावर लहान मुलासारखे उचलून घेतले आहे.हेदेखील वाचा- Sai Lokur Devkarya Ceremony Photos: नवरी नटली! सई लोकुर हिचा देवकार्य विधीसाठी खणाच्या साडीतील लूक पाहून चाहते झाले फिदा, See Pics
View this post on Instagram
सईच्या लग्नाआधी देवकार्य, संगीत, हळदी, मेहंदी असे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. या सर्व विधींमध्ये सोशल डिस्टंसिंगची योग्य ती खबरदारी घेतली गेली. त्याचबरोबर या सर्व विधींमध्ये सईने विशेष रंगाचे ड्रेसकोड देखील ठेवले होते.
2 ऑक्टोबर ला सई आणि तीर्थदिप रॉय यांचा साखरपुडा संपन्न झाला. साखरपुड्याच्या काही दिवस आधी आपल्या होणा-या नव-याला घेऊन चाहत्यांसमोर अनेक कोडी घातली होती. त्यानंतर साखरपुड्याचे फोटो पाहून सईचा होणारा नवरा कोण याचे उत्तर तिच्या चाहत्यांना मिळाले.
सई लोकूर बिग बॉस आधी 2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘किस किसको प्यार करु’ या हिंदी चित्रपटात देखील झळकली होती. यात सईने कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
(The above story first appeared on LatestLY on Dec 06, 2020 01:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

