HSC Exam 2019: रिंकू राजगुरु हिला त्रास नको म्हणून अतिरिक्त पोलीस तैनात; आर्चीला पाहण्यासाठी गर्दी तर होणारच!
परंतू, नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या सिनेमात तिला काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात तिने साकारलेली आर्ची ही व्यक्तिरेखा रसिक प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरली. चित्रपटातील तिच्या अभिनयाची इतकी चर्चा झाली की, तिला थेट राष्ट्रपती पुरस्कार मिळाला.
सैराट फेम आर्ची (Sairat fame Archie). म्हणजेच रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) हो. यंदा इयत्ता बारावीची परीक्षा (Class 12 exams) देते आहे. ही परीक्षा (HSC Exam 2019) उद्यापासून (21 फेब्रुवारी 2019) सुरु होत आहे. आता परीक्षा केंद्र ( Examination Center) तर बदलता येत नाही आणि ते लपवूनही ठेवता येत नाही. त्यामुळे आर्चीला बघायला चाहत्यांची गर्दी उसळणार यात काही शंकाच नाही. अशा उत्साही चाहत्यांचा खुद्द आर्ची ( रिंकू राजगुरु) आणि तिच्यासोबतच इयत्ता बारावीची परीक्षा देणाऱ्या इतर विद्यार्थिनींना त्रास होऊ नये यासाठी महाविद्यालयाने (परीक्षा केंद्र) आगोदरच काळजी घेतली आहे. या चाहत्यांना रोखण्यासाठी सोलापूर येथील महाविद्यालयाने पोलीस प्रशासनाकडे अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताची (Police Security) मागणी केली आहे.
रिंकू राजगुरु हिचे परिक्षा केंद्र कोठे
सोलापूर येथील टेंभुर्णी येथील एका महाविद्यालयात रिंकू राजगुरु हिचे बारावी परक्षेचे केंद्र आहे. याच परीक्षा केंद्रावर परिसरातील इतर महाविद्यालयांतील विद्यार्थीही परीक्षा देणार आहेत. मात्र, रिंकू राजगुरु हिला 'सैराट' चित्रपटामुळे राष्ट्रीय पातळीवर लैकिक मिळाला. राज्यातील तरुणाईमध्येही तिची भलतीच क्रेझ पाहायला मिळाली. त्यामुळे महाराष्ट्रात तिचा प्रचंड मोठा असा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. तिच्या चाहत्यांकडून परीक्षा काळात खास करुन पेपर सोडवताना परीक्षा हॉल किंवा परीक्षा केंद्र परिसरात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी अधिक पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
चाहत्यांच्या त्रासाला कंटाळून सोडली शाळा
दरम्यान, चाहत्यांच्या त्रासाला कंटाळून रिंकू राजगुरु हिने शाळा सोडून बारावी परीक्षेसाठी बारवी परीक्षेसाठी बोर्डाकडे बाहेरुन फॉर्म भरला होता. या फॉर्मनुसार तिचा परीक्षा क्रमांक हा टेंभुर्णी येथील परीक्षा केंद्रावर आला. उद्यापासून ती इयत्ता बारावीची परक्षा देत आहे. (हेही वाचा, HSC Exam 2019: 21 फेब्रुवारीपासून सुरू होतेय बारावीची परीक्षा, कॉपी बहाद्दरांसाठी यंदा MSBSHE चा नवा कडक नियम!)
सैराट चित्रपटामुळे बदलले आयुष्य
रिंकू राजगुरु ही अत्यंत सामान्य कुटुंबातील सामान्य मुलगी आणि विद्यार्थिनी. परंतू, नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या सिनेमात तिला काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात तिने साकारलेली आर्ची ही व्यक्तिरेखा रसिक प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरली. चित्रपटातील तिच्या अभिनयाची इतकी चर्चा झाली की, तिला थेट राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. इतक्या कमी वयात आणि पहिल्याच चित्रपटात राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारी ती पहिलीच अभिनेत्री ठरली आहे. सैराट चित्रपटातून आकाश ठोसर (परशा) आणि रिंकू राजगुरु (आर्ची) हे दोन चेहरे मराठी चित्रपटसृष्टीला मिळाले. सैराट चित्रपटाचा अनके भाषांमध्ये रिमेक झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा कन्नडमध्येही रिमेक झाला. आता कगार या आगामी चित्रपटातून रिंकू राजगुरु प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.