Mukta Barve स्वत: मध्ये केला कायापालट, अभिनेत्रीचे नवं रुप पाहून चाहत्यांना बसेल सुखद धक्का, See Pic

या फोटोमध्ये मुक्ता बर्वे ने आपले केस कुरळे (Curley) करून घेतले आहे. यात ती खूपच क्युट आणि स्टनिंग दिसत आहे.

Mukta Barve स्वत: मध्ये केला कायापालट, अभिनेत्रीचे नवं रुप पाहून चाहत्यांना बसेल सुखद धक्का, See Pic
Mukta Barve New Look (Photo Credits: Instagram)

एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेतून घराघरात पोहोचलेली राधा ऊर्फ मुक्ता बर्वे (Mukta Barve) हिने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अलीकडेच तिने अभिनेत्री काजोलसह 'देवी' या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले होते. त्यानंतर ती बराच काळ छोट्या आणि मोठ्या पडद्यावर दिसली नाही. त्यामुळे तिचे चाहते तिला प्रचंड मिस करत आहेत. मात्र मुक्ता बर्वेने ही कसर सोशल मिडियाच्या माध्यमातून भरून काढली आहे. मुक्ता आपल्या चाहत्यांशी सोशल मिडियाच्या माध्यमातून संवाद साधत असते. आपल्या पोस्टमधून ती चाहत्यांशी नेहमी जोडलेली असते. त्यात नुकतीच तिने इन्स्टाग्राम शेअर केलेल्या तिच्या फोटोमध्ये तिचा कायापालट झालेला दिसत आहे.

या फोटोमध्ये मुक्ता बर्वे ने आपले केस कुरळे (Curley) करून घेतले आहे. यात ती खूपच क्युट आणि स्टनिंग दिसत आहे.हेदेखील वाचा- Devi Trailer: काजोल, नीना कुलकर्णी, मुक्ता बर्वे, सह 9 अभिनेत्रींच्या 'देवी' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित; एका घरात अडकून पडलेल्या नऊ महिलांची कथा मांडणारा अनोखा प्रयत्न (Watch Video)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

तिचा हा कर्ली लूक तिच्या चाहत्यांसह तिच्या इंडस्ट्रीतील मित्रपरिवाला देखील प्रचंड आवडला आहे. तसे छान कमेंट्स तिला मिळत आहे.

मुक्ताने आतापर्यंत अनेक मालिका, नाटके, चित्रपटांमध्ये काम केले आहे. मुंबई पुणे मुंबई, जोगवा, डबल सीट यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले. त्याचबरोबर एका लग्नाची दुसरी गोष्ट, अन्निहोत्र, लज्जा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 29, 2021 09:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).