सुप्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र हिचे 'Unplugged 3' मध्ये इतना शोर शराबा गझल ऐकून श्रोते झाले मंत्रमुग्ध

वैभव जोशी यांनी ही गझल लिहिली असून दत्तप्रसाद रानडे यांनी ती संगीतबद्ध केली आहे. त्यातच सावनीचा गोड आवाज या गझलला लाभला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या नव्या पर्वाची चर्चा सुरु आहे

Savaniee Ravindra Gazal (Photo Credits: Instagram)

मराठीतील एक गोड गळ्याचा आवाज असलेली गायिका सावनी रविंद्र (Savaniee Ravindra)हिने नुकतेच आपले 'सावनी अनप्लग्ड'(Savaniee Unplugged 3) चे तिसरे पर्व भेटील आणले आहेत. 'इतना शोर शराबा क्यूं हैं' (Itna Shor Sharaba Kyu hai) असे या गझलीचे बोल अनेकांवर गझलीने मोहिनी घातली आहे. आजवर सावनीने अनेक मालिकांना तसेच चित्रपटातील गाण्यांना आपला आवाज दिला आहे. त्याचबरोबर ती आपले अनप्लग्ड कार्यक्रम देखील करत आहे. पहिल्या 2 पर्वांना मिळालेल्या श्रोत्यांच्या भरघोस प्रतिसादानंतर आता सावनीने अनप्लग्डचे तिसरे पर्व आणले आहे.

या पर्वात सावनीने आपल्या सुरेल आवाजात 'इतना शोर शराबा क्यूँ हैं' ही सुंदर गझल गायली आहे. वैभव जोशी यांनी ही गझल लिहिली असून दत्तप्रसाद रानडे यांनी ती संगीतबद्ध केली आहे. त्यातच सावनीचा गोड आवाज या गझलला लाभला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या नव्या पर्वाची चर्चा सुरु आहे. World Music Day: संगीत ऐकल्याने तुमच्या शरीरावर होणारे 'हे' आश्चर्यजनक फायदे ऐकून तुम्हीही व्हाल हैराण!

दरम्यान, सावनी ही लोकप्रिय गायिका असून तिची तरुणांमध्ये विशेष क्रेझ आहे. सावनीने मराठीसह तेलुगू, मल्याळम, कन्नड, तामिळ भाषेतूनही अनेक गाणी गायली आहेत. काही काळापूर्वी तिच्या ‘वेन्निलविन सालईगलिल’ या गाण्याला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाले होता. तिने ‘पसंत आहे मुलगी’, ‘कमला’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’ आदी मालिकांची शीर्षकगीतं गायली आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif