Boys 4 Trailer: बॉईज 4 चा धमाकेदार ट्रेलर आऊट, 'या' दिवशी येणार सिनेमागृहात

या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Boys 4 Trailer

Boys 4 Trailer: बॉईज, बॉईज 2, बॉईज 3 च्या यशानंतर आता बॉईज 4 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) रिलीज झाला आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांना या चित्रपटाची आतूरता लागली आहे. चित्रपटात अनेक चेहरे दिसणार आहे. अॅक्शन, कॉमेडी आणि भरपूर ड्रामा असणारा चित्रपट 20 ऑक्टोबरला चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज झाला होता. या सिनेमात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

बॉईज चित्रपटाचे सर्व सिक्वेल हे कॉमेडी होते. 'बॉईज 4' या सिनेमाची निर्मिती अवधूत गुप्तेने केली आहे. लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया या सिनेमाचे निर्माते आहेत. तर हृषिकेश कोळीने या सिनेमाचं लेखन केलं आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड यांच्या भन्नाट अभिनयामुळे चित्रपटाला चार चॉँद लागले आहे. या चित्रपटच्या ट्रेलर मध्ये त्रिकूटने धमाल केली आहे.

चित्रपटात मैत्रीची नवी व्याख्या दिसून येणार आहे. चित्रपटाचं काही शुटींग हे लंडन मध्ये झाल्याचे दिसून आले आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. विशाल सखाराम देवरूखकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.